चंद्रपूर जिल्हयातील एकही योजना शंभर टक्के पूर्ण झाली नाही – खा.प्रतिभा धानोरकर
मूल:- चंद्रपूर जिल्हयातील भाजपाच्या काळातील एकही योजना शंभर टक्के पूर्ण झाली नाही.त्यामुळे त्याचा त्रास जिल्हयातील ग्रामपंचायत आणि नागरिकांना भोगावा लागत आहे असा आरोप खा.प्रतिभा धानोरकर यानी केला.मूल येथे आढावा बैठकीच्या निमित्ताने आले असता स्थानिक विश्रात गृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.यावेळी माजी आ.सुभाष धोटे,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांची उपस्थिती होती. खा.प्रतिभा धानोरकर पुढे म्हणा-या केंद्र शासनाची हर घर जल ही योजना अजून पर्यंत पूर्णत्वास आली नाही.ज्या योजना जिल्हयात कार्यरत आहे,त्या योजना सुदधा अजून पर्यंत पूर्ण झाल्या नाहीत.आत्तापर्यंत जलजीवन मीशनेचे पाणी लोकंापर्यंत पोहचायला पाहिजे होत्या.त्यापेक्षा जुन्या योजना ब-या होत्या असे धानोरकर म्हणाल्या.केंद्राचे भाजपाचे सरकार खोट सुदधा रेटून बोलते असा आरोप त्यांनी यावेळी केला.पंधरावे वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतला कमी पडत असल्याने ग्रामपंचायंत स्तरावर पाणी टंचाईची झळ पोहचत आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने ग्रामिण भागामध्ये वीज आणि पाणी देण्याची मागणी सरपंच संघटनेची आहे.ती मागणी आपण ग्रामविकास मंत्र्यांकडे मांडणार आहे.जिल्हयात भाजपाने आणलेल्या योजना अपयशी ठरत आहे.योजनाचा फक्त ते गवगवा करतात.या योजनेतंर्गत त्यांनी ग्रामिण भागातील रस्त्यांचा सत्यानाश झाला आहे, असे सरते शेवटी खा.प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.
चौपदरीकरणासाठी गडकरी यांची भेट घेणार – नागरिकांची मागणी असलेला मूल ते चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग 930 चे चौपदरीकरण करण्यासाठी कंेद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्याशी येत्या 29 एप्रिल रोजी भेट घेणार आहे. तसेच मूल येथील रेल्वे मार्गावर उडडानपुला संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या चर्चा करून प्रश्न सोडविले जाणार असल्याचे खा.प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.