सावली तालुका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची ग्रामीण व शहर कार्यकारणी गठीत
सावली :-
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्यकारणी च्या सभेत ठरल्यानुसार तालुका कार्यकारणी नव्याने गठीत करण्यात आली. त्या अनुषंगाने सावली तालुका शहर व ग्रामीण कार्यकारणी नव्याने घोषित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष सुनील शेरकी हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष हेमंतकुमार किंदर्ले , माजी तालुका कोषाध्यक्ष केवळराम खवले , मुख्याध्यापक शेंडे, कुडकावार , समर्थ , लोखंडे , पिदुरकर , कामडी , कु गराटे मॅडम यांची उपस्थिती होती. निवडणूक निरीक्षक म्हणून हेमंतकुमार किंदर्ले यांनी जबाबदारी पार पाडली.
यावेळी लोकशाही पद्धतीने खालीलप्रमाणे नवीन ग्रामीण व शहर कार्यकारीणी गठीत करण्यात आली.
सावली तालुका ग्रामीण कार्यकारिणी
अध्यक्ष – विनोद मानापुरे
उपाध्यक्ष – गोविंदा बुरांडे, अरविंद गेडाम, विनायक रेकलवार, कु सपना मेश्राम
कार्यवाह(सचिव) – संतोष गावतुरे
कोषाध्यक्ष – विजय रामटेके
सहकार्यवाह – धर्मा गावंडे,मार्कंड साखरे, लंकेश मानकर, कु पुनम शेंडे
संघटक – दिलीप अगडे, सुनील चावरे, महेश उमरे, सी जी खोबे, कु विजु रामटेके
सल्लागार – केवळराम खेवले, देवराव शेंडे, पृथ्वीराज डोंगरे
प्रसिद्धी प्रमुख – जी बी ताजने
कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख – जी डी निकुरे, एस के बोरकर
यांची निवड करण्यात आली.
सावली तालुका शहर कार्यकारिणी
अध्यक्ष – सुधीर जिवतोडे
उपाध्यक्ष – रामभाऊ चौधरी, घनश्याम मेश्राम, कु आर पी कोतपल्लीवार, कु काजल बारापात्रे
कार्यवाह(सचिव) – हरिदास कस्तुरे
कोषाध्यक्ष – संजयकुमार बनसोड
सहकार्यवाह – अमृतवार सर, अनिल मेश्राम, कु श्रुती रामटेके, युगांधर भोयर
संघटक – मेकर्तीवार सर, प्रथमेश वारजुरकर
सल्लागार – केवळराम खेवले, देवराव शेंडे, पृथ्वीराज डोंगरे
प्रसिद्धी प्रमुख – मंथन नागदेवते, मंगेश देहारकर
कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख – भुजंगराव आभारे, पुरुषोत्तम कन्नाके
यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी निवडणूक निरीक्षक हेमंतकुमार किंदर्ले, जिल्हाध्यक्ष सुनील शेरकी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच शहर व ग्रामीण कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन घनश्याम मेश्राम, प्रास्ताविक विनोद मानापुरे तर आभार प्रदर्शन हरिदास कस्तुरे यांनी केले.