जनतेचा आवाज परिवारातर्फे शिंपी समाजातील दहावीची गुणवंत विदयार्थीनीचा सत्कार
पोलिस अधिक्षक होण्याचे ध्येय
आम्हाला तिचा अभिमान आहे
मूल:- येथील न्यूज पोर्टल जनतेचा आवाज परिवारातर्फे शिंपी समाजातील दहावीची गुणवंत विदयार्थीनी तन्वी अरविंद नामेवार हिचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होवून तन्वीने दहावीत घवघवीत यश प्राप्त केले आहे.तिला 64.80 टक्के गूण मिळाले आहे.मूल येथील स्वामी विवेकानंद विदयामंदीरची ती विदयार्थीनी आहे. अतिशय बिकट परिस्थीतीत अभ्यास करून तन्वीने हे यश मिळवले आहे. ऐन बोर्डाच्या परिक्षेच्या काळात तिच्या आईला दुसरा हार्टअटॅक आल्याने तिच्या अभ्यासात खंड पडला.त्यामुळे गणित आणि भूगोल या विषयाचा तिला पाहिजे तसा अभ्यास करता आला नाही. आई रूग्णालयात भरती आणि दुसरीकडे बोर्डाचे पेपर अशा कठिण काळात तिने घवघवीत यश संपादन केले. म्हणून आम्हाला तिचा अभिमान आहे. आलेल्या संकटावर मात करून जो पुढे जातो त्याला यश निश्चितच प्राप्त होते.अशा परिस्थितीत तन्वीने मिळवलेले यश शिंपी समाजातील विदयार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.तिच्या या धाडसाला सलाम करून न्यूज पोर्टल जनतेचा आवाजने तन्वीच्या घरी जाऊन गुरूवारी ( 15 मे 2025 ) सन्मानपूर्वक सत्कार केला. मुख्य संपादक विनायक रेकलवार आणि सहयोगी संपादक गजानन रेकलवार यांच्या हस्ते तिला गौरवण्यात आले. यावेळी तन्वीचे वडील अरविंद नामेवार आणि आई सपना नामेवार आणि भाऊ उपस्थित होते.पेढे भरवून तिचे मनस्वी अभिनंदन करण्यात आले आणि पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

तन्वीला पोलिस अधिक्षक बनण्याची इच्छा आहे. आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती मन लावून अभ्यास करणार आहे. त्यासाठी ती पुढील शिक्षणानंतर स्पर्धा परिक्षेची तयारी करणार असल्याचे सांगितले.
समाजाचे आपण काही देणं लागतो. समाजाने आपल्याला मोठे केले.त्या समाजाचे ऋण आपण फेडलेच पाहिजे.त्या उद्येशाने,‘समाजाच्या सेवेसाठी – गुणवत्ता वाढीसाठी ‘ हे ब्रीद ठेवले आहे.त्या माध्यमातून शिंपी समाजातील दहावी बारावीतील गुणवंत यशवंत विदयार्थ्यांचा आई वडीलांच्या स्मृती प्रित्यर्थ सत्कार करण्यात येणार आहे.स्व.श्री.ओमाजी पोशटटी रेकलवार आणि स्व.सिंधुताई ओमाजी रेकलवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ तन्वीला सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलेकृ
पारंपारिक व्यवसाय सांभाळून शिंपी समाज आपली प्रगती करीत आहे.मागासलेपणा असल्याने बरेच मूले मूली शिक्षणापासून वंचित राहतात.शिक्षणे घेतले तरी,अर्धवट शिक्षण घेवून रोजगाराच्या शोधात असतात. पुढील शिक्षण घेण्याची त्यांच्यात आवड निर्माण होत नाही.त्या कारणास्तव ,समाजातील विदयार्थी आणि विदयार्थीनींनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे.आपली प्रगती साधली पाहिजे.हा विचारांचा धागा गुंफून ‘समाजाच्या सेवेसाठी – गुणवत्ता वाढीसाठी हे ब्रीद वाक्य ठेवण्यात आले आहे. या प्रेरणादायी उपक्रमाला समाजातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.