मूल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रथम बक्षिस
मूल:- मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमातंर्गत येथील सार्वजनिक बांधकाम उप विभाग कार्यालयास प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. शंभर दिवशीय कार्यालयीन सुधारणांची विभाग स्तरीय सर्वोत्कृष्ट कामगिरीची यादी नुकतीच प्रसिदध झाली. नागपूर विभागामध्ये वेगवेगळया कार्यालयांना प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.त्यात मूल येथील उप अभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालय प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. कळमेश्वर बांधकाम विभाग द्वितीय आणि कुरखेडा बांधकाम विभागास तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.स्वतः चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी आपल्या फेसबुक वर पोस्ट प्रसारीत करून तालुकास्तरीय शासकीय कार्यालयामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरल्याबददल सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता राजेश चव्हाण तसेच सर्व अभियंता व कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे. मूल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने विविध उल्लेखनीय दर्जेदार वेगवेगळी बांधकामे केली आहे.देखण्या इमारती उभारल्या आहेेत.त्यात मूल येथील विश्रामगृहाची इमारत विशेष उल्लेखनीय आहे. आठवडी बाजार ओटयाचे बांधकाम आणि परिसरातील इतर बांधकाम,चिरोली येथिल नदी वरील बंधारा,प्रशासकीय भवन, व्यापारी संकूल, ग्रामिण भागातील रस्ते तसेच इतर बांधकाम उल्लेखनीय आहेत. याच कार्यक्रमातंर्गत मूल येथील बाल संरक्षण अधिकारी कार्यालयास द्वितीय आणि उप अभियंता महावितरण कार्यालयास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.