16

पाच शिक्षण सेवकांच्या बेकायदेशिर नियुक्त्या
मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करा,संस्थाध्यक्ष रामटेके यांची मागणी
मूल:- पाच शिक्षण सेवकांच्या बेकायदेशिर नियुक्त्या करणा-या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी तालुक्यातील जुनासूर्ला येथील योगीराज श्री विक्तूबाबा शिक्षण संस्थेेचे अध्यक्ष सिदधार्थ रामटेके यांनी केली आहे.याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.मुख्यमंत्र्यांसह शालेय शिक्षण मंत्री,प्रधान सचिव यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे. बेकायदेशिर नियुक्त्यांना मान्यता देणा-या विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर आणि शिक्षण विभाग माध्यमिक चंद्रपूर या कार्यालयातील तत्कालिन वरिष्ठ अधिकारी यांची सुदधा या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. मूल तालुक्यातील योगीराज श्री विक्तूबाबा शिक्षण संस्था,जुनासूर्ला अंतर्गत संस्थेच्या दोन शाळा आहे.संस्थेच्या कार्यकारी मंडळाचा फेरफार अर्ज सहायक धर्मादाय आयुक्त,चंद्रपूर यांचे न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. त्याचा गैरफायदा श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल ,जुनासूर्ला येथे कार्यरत मुख्याध्यापक बंडू भाऊराव रोहणकर यांनी संस्थेच्या विश्वस्त मंडळाला कोणतीही पूर्वसूचना न देता स्वतः मनमानीने 13 सप्टेंबर 2022 मध्ये वर्तमानपत्रात जाहिरात देवून दोन शिक्षण सेवकाची बेकायदेशिर नियुक्ती केली. तसेच सिदधार्थ हायस्कूल लोंढोली येथिल तत्कालिन प्रभारी मुख्याध्यापक शामराव झिबलाजी गाढवे यांनीही जुलै 2023 मध्ये जाहिरात देवून तीन शिक्षण सेवकांची नियमबाहय नियुक्ती केली असल्याचे संस्थाध्यक्ष सिदधार्थ रामटेके यांनी सांगितले.यासर्व गैरप्रकाराला चंद्रपूर जिल्हा परिषदेतील तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी आर्थीक गैरव्यवहारातून वैयक्तिक मान्यता दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या अवैध वैयक्तिक मान्यतेच्या विरोधात संस्था सचिवांनी विभागीय उपसंचालक नागपूर यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे.याबाबत उपसंचालकाने प्रधान सचिवांना मार्गदर्शन मागितले आहे. संस्था बौदधधर्मीय अल्पसंख्याक प्राप्त असल्याचे रामटेके यांनी सांगितले. संस्थेतंर्गत कर्मचा-यांच्या नियुक्त्या करण्याचा आधिकार हा संस्थेला असतो. मात्र,या प्रकरणात मुख्याध्यापकांनीच परस्पर शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या करून मोठा आर्थिक गैरप्रकार केला असल्याचे रामटेके यांनी यावेळी सांगितले. संबधित शिक्षण उपसंचालक विभाग आणि शिक्षण विभागाने अशा गैरप्रकाराला मान्यता देवून नियमबाहय कामे केली आहे. यासंपूर्ण गैरप्रकाराची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविली आहे. शिक्षण सेवकांच्या नियुक्तीत मुख्याध्यापकांनी शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे.त्यामुळे मुख्याध्यापकंा विरोधात मूल पोलिस स्टेशन येथे 16 एप्रिल 2025 रोजी लेखी तक्रार दाखल केली आहे. सदया नागपूर विभागात बोगस शिक्षक भरतीचे प्रकरण गाजत आहे. शिक्षण सेवकांच्या नियमबाहय नियुक्त्या करून शिक्षण सेवकांच्या वेतनापोटी शासनाच्या तिजोरीला लाखोचा भूर्दंड मुख्याध्यापकांनी लावला आहे. त्यामुळे मुख्याध्यापक रोहणकर आणि गाढवे यांचेविरूदध फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी संस्थाध्यक्ष सिदधार्थ रामटेके यांनी केली आहे. शिक्षण सेवकांच्या पाचही नियुक्त्या रदद करून उच्च स्तरीय चौकशीची मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष श्रीमती जीजाबाई डोमाजी रामटेके,सचिव सुधीर नारायण गोवर्धन,कोषाध्यक्ष शशिकला नारायण गोवर्धन,सहसचिव जयमाला सिदधार्थ रामटेके,सदस्य संगिता मनोज दुधे आणि विलास निलकंठ गोवर्धन असे सात सदस्यीय विद्यमान कार्यकारी मंडळ उपस्थित होते.