चुकीच्या गतिरोधकामुळे वाहनचालक त्रस्त
मूल ते राजोली मार्ग,दररोज अपघाताची मालिका
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
मूल:- सुसाट धावणा-या वाहनांना ब्रेक लावण्यासाठी मूल ते राजोली मार्गावर बनविलेले गतिरोधक वाहनचालक आणि प्रवाश्यांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक त्रस्त झाले आहेत.चुकीच्या पदधतीने गतिरोधक तयार करण्यात आल्याने या मार्गावर दररोज अपघाताची मालिका सुरू झाली आहे. गतिरोधकामुळे वाहनावरून पडलेल्या एका गंभीर जखमी झालेल्या महिलेला चंद्रपूर येथे उपचारार्थ भरती करण्यात आले आले. तसेच शनिवारी दुपारी धानाचे पोते वाहून नेणा-या ट्रक्टरची ट्राली गतिरोधकामुळे मार्गाच्या बाजूला उलटली. सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधकाची उंची कमी करून सुव्यवस्थित गतिरोधक तयार करावे अशी मागणी गावक-यंानी केली आहे. मूल ते राजोली मार्गावर मरेगाव,चितेगाव,बेलघाटा,डोंगरगाव आणि राजोली येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीच्या पदधतीने गतिरोधक तयार केले. तयार करण्यात आलेल्या गतिरोधकाच्या आसपास बांधकाम विभागाने कोणतेही सूचना फलक लावले नाही.किंवा पांढ-या रंगाचे झेब्रा क्रासिंग पटटे सुदधा देण्यात आले नाही. गतिरोधक उंच तयार झाल्याने दुचाकी वाहनचालकासह चारचाकी वाहनचालकांना ही मोठी डोकेदुखी झाली.दिवसा आणि रात्री या गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांचा आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटत असल्याने या मार्गावर दररोज अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.वाहने उसळत असल्याने मोठया प्रमाणात दुचाकीचे अपघात या ठिकाणी होत आहे.नुकतीच एक महिला उसळून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली.तसेच मूल कडे धानाचे पोते घेवून येणा-या ट्रक्टर चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने धानाचे पोते भरलेली ट्रालीच मार्गावर उलटली. दररोज अपघात होत असल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहे.यामुळे मार्गावरील नागरिकांना सुदधा याचा त्रास होवू लागला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनचालकांच्या हितासाठी सुव्यवस्थित गतिरोधक तयार करावे आणि सुरक्षितेच्या दृष्टीने झेब्रा क्रांसिंग तसेच सूचना फलक लावावेत अशी मागणी स्थानिक नागरिकंानी केली आहे.मूल ते राजोली हा मार्ग सिंदेवाही आणि पुढे नागपूर मार्ग असल्याने नेहमीच या मार्गावरून वाहनांची वर्दळ असते. वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी राजुरी येथे येथील स्थानिक नागरिकांनी जवळचे पैसे खर्च करून अशा उंचवटे तयार करण्यात आलेल्या गतीरोधकावर पांढरे पट्टे मारले आणि वाहन चालकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या मार्गावर दररोज गतिरोधकांमुळे अपघात होत असल्याने संबंधित विभागाविषयी असंतोष व्यक्त होत आहे.