द बर्निंग ई – बस

82
द बर्निंग ई – बस
मूल:- गडचिरोली ते चंद्रपूर धावणा-या ई – बसला अचानक आग लागली.ही बस जळून पूर्णतः खाक झाली. द बर्निंग ई – बसचा थरार प्रवास्यांनी आपल्या उघडया डोळयांनी बघितला.या बस मधील सर्व 43 प्रवासी सुखरूप बाहेर पडले.यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. महाराष्ट राज्य महामंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली.ही घटना शुक्रवारी दुपारी चार ते पाच वाजताच्या दरम्यान चंद्रपूर मार्गावरील घटांचौकी जवळ घडली. गडचिरोली ते चंद्रपूर मार्गावर धावणारी ई बस मूल बसस्थानकावरून प्रवास्यांना घेवून निघाली.भरधाव वेगात धावत असताना घंटाचौकी जवळ अचानक पणे या बसला आग लागली.धुर निघत असल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवास्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. उन्हाच्या तडाख्यात या बसने लगेच मोठा पेट घेतला. पूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. बस जळून पूर्णतः खाक झाली.या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.चालक वाहकासह सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे एका अधिका-याने सांगितले. ई बसला  आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.एकीकडे चंद्रपूर जिल्हयात  उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून पारा 45 अंश डिग्रीच्या वर जात आहे.उन्हाचा फटका सर्व सामान्यांसह वाहनांना सुदधा बसत असल्याचे या घटनेवरून लक्षात येते.अचानक या ई बसला आग लागल्याने प्रवास्यांमध्ये एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि अग्नीशामन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.एसटी महामंडळाचे अधिकारी सुदधा घटनास्थळी दाखल झाले. बसला आग लागल्याने चंद्रपूर ते मूल मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.