दोन गुन्हेगारांकडून तीन मोटारसायकल जप्त

94

 

दोन गुन्हेगारांकडून तीन मोटारसायकल जप्त
आरोपी मूल आणि लोहारा येथील,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मूल:- चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेने दोन गुन्हेगारांना अटक करून त्यांचे कडून चोरीच्या तीन मोटार सायकल जप्त केल्या आहेत.आरोपी मूल येथील भेजगाव आणि लोहारा  येथील आहे. नचिकेत चतूर ठाकरे,वय 22,रा.भेजगाव आणि शानू देविदास चिकराम वय 20 वर्षे ,हल्ली मुक्काम लोहारा अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरी होत असलेल्या मोटार सायकल चोरांच्या शोधात एक मोहीम हाती घेतली. मूल तालुक्यात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना आरोपींची नावे माहित झाली.खबरीने दिलेल्या माहितीनुसार बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे विना कागदपत्र आणि विना नंबरची मोटार सायकल विक्री करण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती मिळाली.त्याअनुषंगाने सापळा रचून शानू देविदास चिकराम आणि ब्रम्हानंद मडावी आणि नचिकेत चतूर ठाकरे यांनी ताब्यात घेतले.आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी रामनगर,चंद्रपूर आणि  चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत ठिकठिकाणाहून मोटार सायकलची चोरी केली होती.याप्रकरणी शानू चिकराम आणि नचिकेत ठाकरे या दोन आरोपींनी अटक केली असून त्यांचे कडून एक लाख 70 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सहायक पोलिस निरिक्षक दिपक कांकडेवार,पोलिस उपनिरिक्षक सुनिल गौरवार,पोलिस हवालदार नितिन कुरेवार,सुरेंद्र महतो,चेतन गज्जलवार,पोलिस अंमलदार गोपाल आतकूलवार,प्रफूल गारघाटे,दिनेश उराडे, पोलिस शिपाई मिलिंद टेकाम यांनी केली.