पोलिस उपनिरिक्षक झालेल्या दीपक दुधेचा
वर्गमित्रांनी केला सत्कार
मूल:- अंमलदार असलेला दीपक दुधे पोलिस उपनिरिक्षक झाला. त्या निमित्त वर्गमित्रांनी त्याचा सत्कार केला.हा सत्काराचा कार्यक्रम हॉटेल शिवार येथे आयोजित करण्यात आला होता.दीपक दुधे वर्गमित्र हा पोलिस अंमलदार म्हणून रामनगर पोलिस स्टेशन चंद्रपूर येथे कार्यरत होता.2013 मध्ये त्याने विभागातंर्गत अर्हता परिक्षा दिलेली होती. काही तांत्रिक कारणास्तव परिक्षा उत्तीर्ण झालेल्या अंमलदाराना उपनिरिक्षक म्हणून पदोन्नती मिळाली नव्हती.त्या नियुक्त्या नुकतेच 16 मे 2025 मध्ये करण्यात आल्या. याबाबत पोलिस महासंचालक कार्यालयाने एक आदेश काढला आहे. 170 जणांच्या अंमलदार यादी मध्ये दीपक दुधे याच्या सुदधा नावाचा समावेश आहे.पोलिस अंमलदारांना स्थानापन्न 25 टक्के कोटयातील निःशस्त्र पोलिस उप निरिक्षक गट – ब (अराजपत्रीत) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.त्यानुसार दीपकला कोकण 2 महसूल विभागातंर्गत मुंबई शहर हे ठिकाण मिळाले आहे.त्यानिमित्त एक वर्गमित्र पोलिस उपनिरिक्षक झाल्या बददल वर्गमित्रांनी सत्काराचा कार्यक्रम घडवून आणला.रविवारी (ता.18 मे ) मूल येथिल बळवंत करकाडे यांच्या हॉटेल शिवार मध्ये दीपकचा शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी पब्लीक पंचनामाचे संपादक विजय सिदधावार,पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अविनाश गरपल्लीवार, पोंभूर्णा पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी किरन वाढई, लोकमतचे पत्रकार राजू गेडाम,हॉटेल शिवारचे संचालक बळवंत करकाडे,कर्मवीर महाविदयालयाचे वरिष्ठ सहायक किशोर वाकडे आणि सकाळचे पत्रकार तथा जनतेचा आवाजचे मुख्य संपादक विनायक रेकलवार उपस्थित होते.

हॉटेल शिवार मधील स्वादीष्ट भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी महाविदयालयीन जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला तसेच रंगलेल्या गप्पागोष्टींना हास्य मुद्रेची झलक सर्वांच्या चेह-यावर दिसत होती.असाच एक वर्ग मित्रांचा मैत्रिणींचा कार्यक्रम दिवाळीत घेण्यात यावा असे यावेळी ठरविण्यात आले.