वाघाच्या हल्ल्यात सोमनाथ प्रकल्पातील कार्यकर्ता ठार
आमटे फार्म परिसरातील घटना,खळबळ
मूल:- आमटे फार्म येथील सोमनाथ प्रकल्पातील कार्यकर्ता वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. जंगला लगत परिसरात असलेल्या आंब्याच्या बगिच्यातील आंबे वेचण्यासाठी गेला असता त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्यास ठार केले. ही घटना मारोडा बीटा अंतर्गत बफर झोनच्या कम्पार्टमेंट नंबर 792 मध्ये घडली. जयदेव पोतलू करनकर, वय 65 वर्षे असे मृतक कार्यकर्त्याचे नाव आहेे. सोमनाथ प्रकल्पाच्या परिसरालगतच ही घटना घडल्याने प्रकल्पात खळबळ उडाली आहे. अगदी हाकेच्या एक किमी अंतरावर सोमनाथ सफारी गेट सुदधा आहे.सोमनाथ प्रकल्पाला लागून बफरचे जंगल आहे.याच परिसरात आंब्याचा बगिचा आहे.आंबे पाडाला येत असल्याने पडलेले आंबे वेचण्यासाठी जयदेव पोतलू करनकर हा रविवारी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान गेलेला होता. सायंकाळी जयदेव घरी न आल्याने पत्नीने ही बाब प्रकल्पाचे व्यवस्थापक अरूण कदम यांच्या लक्षात आणून दिली. कदाचित जयदेव वाघाच्या हल्ल्यात ठार झाला असावा असा संशय बाळगून याची माहिती वनविभागाला देण्यात आली.वनविभाग आणि प्रकल्पाच्या कार्यकर्त्यानी शोध राबविली.मात्र,रात्र झाल्याने ही शोधमोहीम थांबविण्यात आली.सोमवारी सकाळी शोधमोहिमे दरम्यान जयदेवच्या शरीराचे अवयव एका नाल्याच्या ठिकाणी आढळले. जयदेवला ठार करून त्याचा मृतदेह फरफटत नेऊन वाघाने शरीराचे पूर्ण लचके तोडलेले आढळले. घटनास्थळी वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी भेट दिली.पंचनामा नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मूल येथिल उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले.
प्रकल्पातील जुना कार्यकर्ता:– कुष्ठरूग्ण असलेला जयदेव पोतलू करनकर हा सोमनाथ प्रकल्पातील जुना कार्यकर्ता होता.मागिल चाळीस पन्नास वर्षापासून प्रकल्पामध्ये काम करीत होता. सोमनाथ प्रकल्पातील दुध डेअरी विभाग सांभाळायचा. बगिच्यातील आंबे वेचायला जाणे हे त्याच्या जीवावर बेतले. त्याला पत्नी आणि मूले आहेत.
शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा:– जयदेव करनकर हा सोमनाथ प्रकल्पातील कार्यकर्ता होता.वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याने जयदेवच्या कुटुंबीयांना शासनाच्या योजनेचा सर्व लाभ मिळावा.अशी मागणी सोमनाथ प्रकल्पाचे व्यवस्थापक आणि महारोगी सेवा समिती वरोराचे विश्वस्त अरूण कदम यांनी केली आहे.
तालुक्यात खळबळः-
वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे मूल तालुक्यात खळबळ उडाली आहे.तसेच मोठी चिंता व्यक्त केल्या जात आहे. एकटया मे महिण्यात मूल तालुक्यातील सहा जणांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला आहे.जून महिण्यातील ही पहिली घटना आहे. वाघाच्या हल्यातील ठार झालेल्यांचा आकडा अधिकच फुगत चालल्याने येथील मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात जनावरे सुदधा ठार होत असल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
टी – 87 चे दर्शन:– मूल तालुका बफर,प्रादेशिक,सामाजिक आणि वनविकास महामंडळाच्या जंगलाने व्याप्त आहे.चारही बाजूने वाघाचे अस्तित्व आहे.तसेच इतर वन्यप्राण्याचे संख्या सुदधा अधिक आहे.बफरच्या करवन आणि काटवन परिसरात गस्तीवर असलेल्या वन कर्मचा-यांना टी-87 या वाघाचे दर्शन झाले.टी-87 या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश आहेत.मात्र हा वाघ हुलकावणी देत असलयाने वनविभागाला अपयश येत आहे.