कॉंग्रेसमध्ये एकतेचे दर्शन ,कंबर कसून प्रचार
वार्डावार्डात मुसंडी,नव परिवर्तनाचा ध्यास
मूलच्या सर्वांगिण विकासाला अग्रक्रम:-
कॉंग्रेसमध्ये परिवर्तनाचा नारा:-
वार्डावार्डात मुसंडी,नव परिवर्तनाचा ध्यास
मूल:- तब्बल चार वर्षानंतर होणा-या मूल नगर पालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसने विजयाची वज्रमूठ बांधली आहे.येथे चैतन्याचे वातावरण असून पक्षात एकतेचे दर्शन दिसून येत आहे.यंदा प्रथमच कॉंग्रेसमध्ये प्रशांत रूपी भरतीची लाट आली आहे. महासागरातील प्रचाराच्या लाटा वार्डावार्डात जोरदार मुसंडी मारत आहेत.विजयाचा ध्यास असल्याने संतोष रूपी सुदर्शन चक्र योग्य संकल्पाच्या दिशेने फिरत असल्याची राजकीय वर्तुळातील चर्चा आहे. राजकीय तज्ज्ञांचे हे अमृतासमान शब्दांना आजच्या घडीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. राजकीय गोटात तर्कवितर्क लढविल्या जात असले तरी,कॉंग्रेसने आरंभलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे बोलल्या जात आहे.
मूलच्या सर्वांगिण विकासाला अग्रक्रम:-
मूल शहराच्या सर्वांगिण विकासाला अग्रक्रम देण्याची ग्वाही कॉंग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.एकता प्रशांत समर्थ यांनी दिला आहे. त्यांच्या प्रचाराने आघाडी घेतल्याची चर्चा आहे. कॉंग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उमेदवारांच्या प्रचारार्थ समर्थनीय भूमिका निभावीत आहेत.
कॉंग्रेसमध्ये परिवर्तनाचा नारा:-
पालिका निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेसमध्ये परिवर्तनाचा नारा जोर धरत आहे.त्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात जोश,उत्साह आणि नव चैतन्याचे चित्र आहे.नवी उमेद संचारल्या गेल्याने परिवर्तनाची लाट नक्कीच उसळणार असे राजकीय जाणकांराचे म्हणणे आहे. कॉंग्रेसचे उमेदवार प्रशांत समर्थ,राकेश रत्नावार,ऋतीक गोयल,विवेक मुत्यलवार,अशोक येरमे,मिथून गददेवार,अतूल गोवर्धन,विलास कागदेलवार,तुकाराम गुरनूले,लीना फुलझेले,समिक्षा कडस्कर,ज्योती चटारे,काजल धारणे,पायल महाडोळे,उज्ज्वला मडावी,शालू शेरकी,भारती मेश्राम,नलीनी आडपवार,सुशिला खोब्रागडे इत्यादी धडाडीच्या उमेदवारांनी आपल्या विजयासाठी कंबर कसली आहे.




