महानगरपालिका क्षेत्रात 25 तर,नगर पालिका क्षेत्रात 45 दिवसात सिलेंडर वाटप
पेट्रोलियम मंत्रालयाचा हा कोणता न्याय ?
नगर पालिका क्षेत्र आणि ग्रामिण भागात 25 दिवसात घरगुती सिलेंडर दया
मोतीलाल टहलियानी यांची मागणी
मूल:- पश्चिम आशीयाईतील युदधामुळे भारतात सर्वत्र गॅस टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला.दोन वेळच्या जेवणाची भ्रांत मिटवण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडरची निकड अतिशय भासू लागली.सर्वांना सिलेंडर मिळेल अशी हमी केंद्राने दिली असली तरी 25 आणि 45 दिवसाचा नियम शहरी आणि ग्रामिण लोकांमध्ये दुजाभाव करणारा ठरला आहे.नियमानुसार आम्हालाही 25 दिवसात गॅस सिलेंडर मिळावे अशी मागणी येथील माजी नगरसेवक मोतीलाल टहलियानी यांनी केली आहे. केंद्राच्या नियमानुसार,ऑनलॉईन बुकींग नंतर महानगर पालिका क्षेत्रात 25 दिवसात तर, नगर पालिका क्षेत्र आणि ग्रामिण भागात 45 दिवसात गॅस सिलेंडर मिळणार आहे. हा नियम शहरी आणि ग्रामिण मध्ये दुजाभाव करणारा ठरणार आहे. केंद्राचा हा कोणता न्याय आहे?असा प्रश्न त्यांनी केला आहे. वाटप होणारा घरगुती वापराचा सिंलेंडर हा सारखाच राहणार आहे.कुटुंबाच्या संख्येनुसार काही अंशी वापरण्याची पदधत वेगवेगळी राहू शकते.त्यानुसार सिंलेंडरची मागणी मागे पुढे होईल यात काही वावगे नाही.परंतु एकदम वीस दिवसाचा फरक नगर पालिका क्षेत्र आणि ग्रामिण लोेेकांवर लादून केंद्राने नागरिकांवर एक प्रकारे अन्याय केला असल्याचे मोती टहलियानी यांनी म्हटले आहे. ग्रामिण भागातील आम्ही रहिवासी या देशाचे नागरिक नाही का ? असा संतप्त सवाल त्यांनी केंद्राला केला आहे.नागरिकांच्या हितासाठी आणि सुरूक्षित व आरोग्यदायी जीवनासाठी नगर पालिका क्षेत्र आणि ग्रामिण भागातही 25 दिवसात गॅस सिलेंडर मिळावे अशी मागणी मोतीलाल टहलियानी यांनी क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यामातून भारत पेट्रोलियम मंत्री यांच्या कडे केली आहे.
व्यावसायिक सिलेंडर सुदधा तात्काळ मिळावे:- पत्रातून त्यांनी व्यावसायिक सिलेंडर सुदधा तात्काळ मिळावेत अशी मागणी केली आहे.सिलेंडर अभावी छोटे मोठे हॉटेल, चहा ,नास्ता टपरी बंद पडत आहेत.यावर त्यांचा आणि त्यावर आधारीत मजूरांचा रोजगार अवलंबून आहे.छोटे व्यावसायिक नास्ता सेेंटरवर टंचाईचा परिणाम जाणवू लागला आहे.व्यावसायिक सिलेंडर मिळणे कठीण झाल्याने घरगुती सिलेंडरचा काळाबाजार चालण्याची शक्यता जास्त आहे.त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना सुदधा निळया रंगाचे व्यावसायिक सिलेंडरचा तात्काळ पुरवठा व्हावा असे मोतीलाल टहलियानी म्हटले आहे.गॅस सिलेंडर मिळणे कठीण झाल्यास जळावू लाकडासाठी जंगल तोड मोठया प्रमाणात होण्याची भिती त्यांनी बोलून दाखविली.यातही वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांच्या जीवाला जास्त धोका असण्याची शक्यता वर्तविली आहे.