वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
केळझर वनपरिक्षेत्रातील घटना
मूल :- जंगलात चराईसाठी जनावरे घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना प्रादेशिक वनविभागाच्या केळझर परिक्षेत्रातील कम्पार्टमेंट नंबर 431 मध्ये घडली. मृतक गुराख्याचे नाव गणपत लक्ष्मण मराठे,वय 58 वर्षे असे आहे. शनिवारी सकाळी गुराख्याचा मृतदेह जंगलात आढळून आला. केळझर येथिल गणपत लक्ष्मण मराठे हे नेहमी प्रमाणे शुक्रवारी जंगलात गावातील जनावरे चराई साठी घेऊन गेले होते. जनावरांनी सायंकाळी गावाकडे जाणारा रस्ता पकडला. घरापर्यंंत गाई म्हशी पोहचल्या. मात्र गणपत मराठे आढळून आले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी ही माहिती येथिल वनविभागाला दिली. वनविभागाने शोधमोहिम राबविली. शनिवारी सकाळी परत शोधमोहिम राबविली असता प्रादेशिक वनविभागाच्या कम्पार्टमेंट नंबर 431 मध्ये झुडूपात त्यांचा मृतदेह आढळून आला. जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी प्रादेशिक वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे,एफडीसीएमचे वनपरिक्षेत्राधिकारी बोधे,क्षेत्रसहायक पडवे यांनी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. चालू वर्षातील प्रादेशिक वन विभागातील वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची ही पहिलीच घटना आहे. वन विभागातर्फे मराठे यांच्या कुटुंबीयांना तातडीची तीस हजार रुपयांची मदत करण्यात आली.