किराणा दुकानाच्या व्यापारास नव्वद हजार रूपयांनी लुटले

79
किराणा दुकानाच्या व्यापारास नव्वद हजार रूपयांनी लुटले
नागाळा गावाजवळ लुटमार,पाच आरोपींना अटक,दोन आरोपी फरार
मूल
 :- येथिल एका किराणा दुकानाच्या व्यापारास नव्वद हजार रूपयांनी लुटले.ही लुटमारीची घटना चंद्रपूर मार्गावरील नागाळा या गावाजवळ रविवारी घडली.याबाबत, व्यापाराने मंगळवारी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपींविरूदध गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी, मूल येथिल पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी फरार झाले आहेत. आरोपी 24 ते 38 वयोगटातील आहेत. या घटनेने व्यापारांमध्ये खळबळ उडाली आहे. मूल येथील पंकज सुरेश जुमडे यांचे ताडाळा रोडवर किराणा मालाचे दुकान आहे. दुकानातील किराण्याचे सामान तेलंगणातील कागजनगर येथे स्वस्त मिळतात म्हणून ते कागदनगर येथे गेले होते. परंतु,रविवार असल्याने  सदर दुकान बंद होते.त्यामुळे  ते सामान न घेताच चंद्रपूर मार्गे मूल कडे परत निघाले. स्वीप्ट या  चार चाकी  वाहनाने मूल कडे येत असताना पाच ते सहा आरोपींनी अर्टिगा वाहन त्यांच्या वाहनासमोर थांबवून जुमडे यांचे वाहन अडविले. त्यांना व त्यांच्या सोबतीला असलेल्या इतर दोघांना लोखंडी टॉमीने मारहाण करून जखमी केले.जुमडे यांच्या जवळील सत्तर हजार रूपये व दोन भ्रमणध्वनी हिसकावून घेतले. नगदी 70,000 रूपये आणि दोन मोबाईल किंमत 20,000 रूपये असे एकून 90,000 हजार रूपयांची लुटमार केली. पंकज जुमडे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपींविरूद गुन्हा दाखल केला.लुटमारीतील  निरज प्रसाद रायपूरे,तोहित आरीफ शेख,सचिन श्रीराम लाकडे,शोएब वाजीदखान पठाण,गणेश मनोहर चव्हाण सर्व रा.मूल यांना अटक केली. नौशाद पठाण आणि आकाश राम हे दोन आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध पोलिस घेत आहे.
पुढील तपास जिल्हा पोलिस अधिक्षक,अप्पर पोलिस अधिक्षक,उपविभागीय पोलिस अधिकारी आणि  पोलिस निरिक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक अविनाश मेश्राम ,सहायक फौजदार उत्तम कुमरे,पोलिस हवालदार भोजराज मुंडरे,सचिन सायंकार,नायब पोलिस अंमलदार चिमाजी देवकते,पोलिस अमलदार शफीक शेख करीत आहे.
अटक करण्यात आलेल्या पाच आरोपीचा दोन दिवसांचा पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आला आहे.दोन आरोपीच्या शोधासाठी मूल पोलिसांची एक टीम रवाना करण्यात आली आहे.