साडे सतरा लाख रू.किंमतीच्या अवैध देशी विदेशी दारूसाठयावर रोडरोलर
मूल पोलिसांची कार्यवाही
मूल :- येथील पोलिस ठाण्यातंर्गत विविध प्रकरणात अवैध देशी विदेशी दारूसाठा जप्त केला होता.त्या 109 प्रकरणातील सतरा लाख 84 हजार 395 रूपये किंमतीच्या दारूसाठयावर नुकतेच रोडरोलर फिरवून साठयाचा नाश केला.ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस उप अधिक्षक प्रमोद चौगूले यांनी केली. मूल येथिल पोलिस ठाणे अंतर्गत दारूबंदी कायदयान्वये 2023-2024 या कालवधीमध्ये अवैध देशी विदेशी दारूच्या संदर्भात 109 प्रकरणे दाखल झाली होती. जप्त झालेल्या सर्व मुददेमालाचा निपटारा करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष मोहिम राबविण्यात आली.यासाठी मूल पोलिस ठाण्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग,चंद्रपूर यांच्या कडे पत्रव्यवहार केला होता. अवैध असलेला दारूसाठा नाश करण्यासाठी आदेश मिळताच बुधवारी 12 मार्च रोजी मूल पोलिस ठाणे हददीतील मौजा चांदली बुर्ज रोडवरील झुडपी जंगलाजवळ 17 लाख 84 हजार 395 रूप्ये किंमतीचा हा संपूर्ण अवैध दारू साठा रोडरोलनने नाश करण्यात आला.यावेळी दोन पंच,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुययम निरिक्षक संदीप राऊत,परिविक्षाधीन पोलिस उप अधिक्षक प्रमोद चौगूले आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते.