अवैध गौवंश वाहतूक करणा-यांकडे सापडले धारदार शस्त्र

186
अवैध गौवंश वाहतूक करणा-यांकडे सापडले धारदार शस्त्र
अकरा जनावरांची सुटका, अकरा लाख रूपयांची मालमत्ता जप्त

मूल :- गोपनीय माहितीच्या आधारे जनावरांची ( गौवंश ) अवैध वाहतूक करणारे वाहन मूल पोलिसांनी पकडले.त्यातून अकरा जनावरांची सुटका करण्यात आली.तसेच आरोपींकडे एक धारदार शस्त्र सुदधा सापडले. मूल पोलिसांच्या या दबंग कारवाईमुळे जनावरांची अवैध वाहतूक करणा-यांचे धाबे दणाणले आहे.याप्रकरणी,चार आरोपींना अटक करण्यात आली असून अकरा लाख पाच हजार रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.12 मार्च रोजी मूल पोलिसांनी मौजा नवेगाव भूज शेतशिवारात ही कारवाई केली.गोपनीय माहितीच्या आधारे नाकाबंदी करून करून वाहनाची तपासणी करण्यात आली. एम एच 34 बी झेड 0623 या वाहनामध्ये पाच जनावरे आणि एमएच 29 बी ई 2304 या वाहनामध्ये सहा जनावरे आढळून आली.दोन्ही वाहनातून अकरा गौवंश त्याची किंमत दोन लाख पाच हजार रूप्ये,दोन्ही वाहनांची किंमत नऊ लाख रूप्ये,असा एकूण अकरा लाख पाच हजार रूप्यांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.तसेच आरोपींकडून एक धारदार शस्त्र  व त्यांचा वापरता मोबाईल जप्त करण्यात आले.ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलिस अधिक्षक दिनकर ठोसर ,उपविभागाीय पोलिस अधिकारी, परिविक्षाधिन पोलिस उप अधिक्षक प्रमोद चौगूले,पोलिस निरिक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक अमितकुमार आत्राम ,पोलिस हवालदार प्रशांत गायकवाड,सुनिल कुळमेथे,भोजराज मुंडरे,पोलिस अंमलदार विशाल वाढई,प्रेम दासरवार यांनी केली.दरम्यान, मूल पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम,प्राण्यांना निदर्यतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम आणि भारतीय हत्यार कायदयाप्रमाणे एकूण चार आरोपींविरूदध व एक विधीसंघर्ष बालक याचे विरूदध गुन्हा नोंद करण्यात आली आहे.