दानशुरांच्या माध्यमातून ग्रामिण भागातील मुलभूत विकास शक्य  – संध्याताई गुरनूले – जनतेचा आवाजने जाणून घेतले त्यांचे मत

128

दानशुरांच्या माध्यमातून ग्रामिण भागातील मुलभूत विकास शक्य  – संध्याताई गुरनूले
जनतेचा आवाजने जाणून घेतले त्यांचे मत

मूल:- महाराष्ट्रात अनेक दानशुर व्यक्ती आहेत.बडे श्रीमंत आहेत. करोडो रूपयांमध्ये खेळणारे  उदयोगपती,क्रिकेटर,कलाकार,चित्रपट निर्माते,राजकारणी आहेत. या सर्वांची महाराष्ट्रात मांदियाळी आहे.यांनी राज्यातील ग्रामिण भागाचा विविध विकास केला पाहिजे. अशा दानशुरांच्या माध्यमातून ग्रामिण भागाचा मुलभूत विकास होण्यास मोठी मदत  मिळेल असे परखड आणि स्पष्ट मत चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संध्याताई गुरनूले यांनी जनतेचा आवाज शी बोलताना व्यक्त केले. 

 ग्रामिण भाग विकासापासून कोसो दुर आहे.शासनाच्या तुटपुंज्या निधीतून विविध विकासात्मक कामे होणे शक्य नाही. ग्रामिण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यातील विविध क्षेत्रात असलेल्या अनेक दानशुरांनी समोर आले पाहिजे.राजकीय दृष्टया संवेदनशिल असलेला  चंद्रपूर जिल्हा विकासात्मक धोरणात मागे आहे.येथील आर्थीक उन्नती स्तर कमी आहे.वर वर पाहता औद्योगिक नगरी आणि ब्लॅक  गोल्ड सिटी म्हणून चंद्रपूर जिल्हयाची ओळख असली तरी , येथे बेरोजगारांचा मोठा प्रश्न आहे.अनेकांच्या हाताला रोजगार नसल्याने अनेक वाईट मार्गाकडे युवा पिढी वळत चालली आहे.त्यामुळे जिल्हयातील गुन्हेगारीची आलेख चढता दिसत आहे.जिल्हयातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे.शेतीवर अंवलबून अनेक कुटुंब आहेत.बारमाही शेती अनेक भागात होत नाही.सिंचनाची समस्या सुदधा मागिल अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे.जिल्हा सुजलाम सुफलाम होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.ग्रामिण भागातील शासकीय,निमशासकीय,आश्रमशाळा,निवासी आश्रमशाळा ,वस्तीगृह यांचा गहन प्रश्न आहे.या सर्व शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी दानशुरांची आवश्यकता आहे.
येथील शैक्षणिक दर्जा उंचावणे गरजेचे आहे.विदयार्थ्यांची शाळेतील गळती कमी होवून त्याला उच्च दर्जाचे शिक्षण मिळणे हे त्याचे कर्तव्य आहे.  विविध मुलभूत सोयीपासून ग्रामिणसह शहरी भाग वंचित आहे.पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे.विदयुत बिल न भरल्यामुळे ग्रामिण भागातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद आहे.स्वच्छतागृहांचा अभाव आहे.हांगदारीमुक्त गावे नाहीत.घरकुलांचा प्रश्न आहे.आरोग्याचा प्रश्न आहे.ग्रामिण भागातील दवाखान्या तील सोयाीसुविधा वाढविणे गरजेचे आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे.अशा विविध कारणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत दानशुरांनी सढळ हाताने एक एक गावे,शाळा दत्तक घेवून मुलभूत सोयींसाठी आणि गावाच्या आर्थीक उन्नतीसाठी हातभार लावला पाहिजे. 
बेरोजगारांच्या हाताला रोजगाराची संधी उपलब्ध करून दयावी.शेती सुजलाम सुफलाम करण्यासाठी बारमाही सिंचनाची सोय उपलब्ध करून दयावी,बचत गटांना प्रोत्साहन दयावे,छोटे मोठे उदयोग गावातच उभारून आर्थिक विकासाचा स्तर  उंचवावा. मुलींच्या उच्च शिक्षणावर भर दयावा.शेतक-यांच्या शेतमालाला चांगले भाव मिळावेत,शेतीवर आधारीत पुरक व्यवसायाच्या भरभराटी साठी विविध योजना राबवाव्या. शेवटी गावाच्या विकासावरच देशाचा विकास अवलंबून आहे.गावाच्या,समाजाच्या विकासासाठी आणि ग्रामिण भागातील सर्वांचाच आर्थीक स्तर उंचावण्यासाठी  राज्यातील दानशुरांनी शासन, प्रशासनाच्या मध्यस्तीने हातभार लावावा असे मत संध्याताई गुरनूले यांनी जनतेचा आवाज न्युज पोर्टलशी बोलताना व्यक्त केले.