अॅड. प्रा.ऐश्वर्या आक्केवार झाल्या डॉक्टरेट
शिंपी समाजात मानाचा तुरा
चंद्रपूर:- येथील सरदार पटेल महाविदयालयातील सहा.प्राध्यापिका अॅड.ऐश्वर्या अरविंद आक्केवार – सोनी यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. गोंडवाना विदयापीठ गडचिरोली येथे झालेल्या पीएचडीच्या सादरीकरणात तज्ज्ञ समितीच्या चमु समोर त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. चंद्रपूर जिल्हयाच्या संदर्भात ऑफलाईन व्यवसाय आणि ऑनलाईन व्यवसायाचे व्यवस्थापन,धोरणे या विषयावर पीएचडीसाठी प्रबंध ग्रंथ सादर केला. डॉ.राहूल सावलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. अॅड.प्रा. ऐश्वर्या अरविंद आक्केवार यांनी पीएचडीची पदवी प्राप्त करून आपल्या वडीलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.ही पदवी प्रा.ऐश्वर्याने आपल्या वडीलास समर्पित केली आहे. शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार असलेल्या ऐश्वर्याने एक उच्च शिखर गाठत आपले ध्येय पूर्ण केले. चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविदयालयातून इंग्रजी माध्यमातून बी.कॉम,एम.कॉम आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. याच महाविदयालयात एलएलबीचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून वकील होण्याचे स्वप्न सुदधा साध्य केले. प्रथम श्रेणीत पास झालेल्या ऐश्वर्याचा गोंडवाना विदयापीठाने सन्मान सुदधा केला आहे. गोंडवाना विदयापीठाचा शैक्षणिक वर्षे 2013-14 चा आदर्श विदयार्थी पुरस्कार सुदधा प्राप्त केला आहे. सहा.प्राध्यापीका असलेल्या ऐश्वर्या अरविंद आक्केवार (सोनी)च्या नावापुढे आता अॅडव्होकेट,डाक्टरेट, अशा नामाची बिरूदावली लागणार आहे. ऐश्वर्या आक्केवार सरदार पटेल महाविदयालयात वाणिज्य विभागात पदवी आणि पदव्युत्तरच्या विदयार्थ्याना शिकवतात. अॅड.प्रा.ऐश्वर्या आक्केवार-सोनी यांनी आपल्या पीएचडीच्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ.राहूल सावलीकर तसेच आई पुष्पाताई,भाऊ आदित्य,भाविक आणि पती प्रेम सोनी यांना देते. शिंपी समाजातील मुलीने प्राप्त केलेल्या उच्च यशाबददल शिंपी समाजातर्फे कौतुकाचा वर्षाव होत आहे. एक मानाचा तुरा रोवला आहे.

विदयार्थ्यांनी आपले ध्येय गाठताना अपयशाची भिती मनात बाळगू नये. आलेल्या परिस्थितीवर मात करून अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचेच आहे हा आत्मविश्वास उराशी बाळगून विदयार्थ्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करावे असे प्रा.डॉ.अॅड.ऐश्वर्या आक्केवार-सोनी म्हणतात.