मरेगावचे गुराखी झाले त्रिशूल धारी
स्वरक्षणार्थ साहित्यांचे वाटप,मानव-वन्यजीव संघर्षावर उपाय
मूल:- विनायक रेकलवार
वाघांच्या वाढत्या हल्ल्यांना बेजार झालेल्या गुराख्यांना त्यांच्या स्वरक्षणार्थ वनविभागातर्फे त्रिशूल आणि इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.या साहित्यांमुळे गुराखी बांधवाचे थोडया फार प्रमाणात त्यांचे रक्षण होण्याची शक्यता आहे.वाघाच्या हल्ल्यात बळी जाण्याची भिती यामुळे काहिसी कमी होणार आहे. मानव वन्यजीव संघर्षावर उपाय म्हणून डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत या साहित्याचे वाटप तालुक्यातील मरेगाव येथे गुराखी बांधवाना करण्यात आले. मूल तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे.मागिल दोन तीन वर्षांच्या काळात या संघर्षात अनेक गुराखी बांधव,शेतकरी,शेतमजूर वर्ग आणि जंगलाशेजारी राहणा-या इतर सर्वसामान्य नागरिकांचा यात निष्पाप बळी गेलेला आहे. यात घरातील कर्ता पुरूष आणि कर्ती महिलांचा बळी गेल्याने संबंधित कुटुंबावर मोठया प्रमाणात आघात झालेला आहे. संसार विस्कळीत होत असल्याने विविध संकटाचा सामना त्या कुटुंबीयांना भोगावा लागतो.त्यामुळे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत मूल तालुक्यातील संयुक्त वन व्यवस्थापन समिती मौजा मरेगाव येथील गुराख्यांना वाघाच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी त्रिशूल काठी,इलेक्ट्रीकल स्टन बटन,घुंगरू काठी, डोक्याच्या मागे लावायचे मुखवटे आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यामुळे मरेगाव येथिल गुराखी बांधव आता त्रिशूल धारी बनले आहेत. सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत या साहित्य वितरन कार्यक्रमात वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशिनाथ गुरनूले,वनरक्षक नागोसे,पोलिस पाटिल पुंडलिक जवादे तसेच गुराखी बांधव आणि गावकरी उपस्थित होते.
जंगलाशेजारी गावांना व्हावे साहित्याचे वाटप
मूल तालुक्यात करवन,काटवन,मारोडा,सोमनाथ,भादूर्णी,उसराळा,डोणी,फुलझरी,जानाळा,चिरोली,केळझर,ताडाळा,चिचाळा,बोरचांदली,राजगड,आकापूर,चितेगाव,दहेगाव,मानकापूर,मूल यासह अनेक गावे जंगलाशेजारी आहेत.या गावातील गुराखी आणि शेतक-यांचा जंगलाशी जवळचा संबंध आहे.तसेच काही शेतक-यांच्या शेतजमिनी जंगलाशेजारी आहे.गुराखी बांधवाना गुरे चराईसाठी आपल्या जनावरांना जंगलात न्यावी लागतात.त्यातून मानव वन्यजीव संघर्ष हे नित्याचेच ठरले आहे.अशा गावातील गुराखी,शेतकरी,शेतमजूर आणि स्थानिक गावातील नागरिकांना सुदधा त्रिशूल सह स्वरक्षणार्थ साहित्याचे वाटप करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

|