मूल पोलिसांची कोंबडा बाजार जुगारावर धाड

124
मूल पोलिसांची कोंबडा बाजार जुगारावर धाड
7 लाख 24 हजार 700 रूप्यांचा मुददेमाल जप्त

काळीपिवळी वाहनासह पाच कोंबडे जप्त
मूल:- येथील पोलिसांनी कोंबडा बाजार जुगारावर धाड मारली.हा कोंबडा बाजार पोंभूर्णा तालुक्यातील मौजा चक फुटाणा येथे सुरू होता.यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दहा आरोपी फरार झाले.घटनास्थळावरून पोलिसांनी काळी पिवळी वाहनासह मोटार सायकली,पाच कांेबडे,वीस लोखंडी धारदार कात्या,रोख रक्कम असा एकूण सात लाख 24 हजार 700 रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी तेरा आरोपींविरूदध महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना रविवारी घडली. मूल पोलिस स्टेशन अंतर्गत मौजा चक फुटाणा येथे सार्वजनिक ठिकाणी कोंबडा बाजार जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. काही  इसम कोंबडयाच्या पायांना काती बांधून त्यांची झुंज,पैशाची बाजी, तसेच कोंबडयांचा आणि पैशांचा हारजीतचा जुगार खेळीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.धाड टाकलेल्या पोलिसांना पाहून जुगारींनी पळ काढला.यापैकी तीन इसमांना पकडण्यात आले.उर्वरीत दहा जुगारी आपले वाहन मौक्यावर सोडून पळून गेले.घटनास्थळा वरून नऊ मोटार सायकली,एक काळी पिवळी वाहन,2400 रूपये नगदी,पाच कांेबडे आणि वीस लोखंडी धारदार कात्या असा एकूण 7 लाख 24 हजार 700 रूपयांचा मुददेमाल जप्त केला.अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे संजय रामदास सोनटक्के,रा.चक फुटाणा,प्रविण चरणदास सोनटक्के,रा.देवाडा खुर्द,भिमा शंकर पेंदोर,रा.कवडजई अशी आहे.आरोपींविरूदध महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव,सहा.पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अमितकुमार आत्राम,पोलिस हवालदार जमीरखान पठाण,सुनिल कुळमेथे,भोजराज मुंडरे,प्रशांत गायकवाड,पोलिस अंमलदार नरेश कोडापे,वेदनाथ करंबे,पंकज बगडे,गणेश मेश्राम,शिवशंकर डुकरे हे करीत आहे.