महामार्गावरील मोकाट जनावरांमुळे अपघाताची शक्यता – नगर पालिकेचे दुर्लक्ष,कोंडवाडयात रवानगी करण्याची मागणी

120
महामार्गावरील मोकाट जनावरांमुळे अपघाताची शक्यता
नगर पालिकेचे दुर्लक्ष,कोंडवाडयात रवानगी करण्याची मागणी

मूल:- वाहतुकीच्या महामार्गावर असलेल्या मोकाट जनावरांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.याकडे स्थानिक नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.पालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.रस्त्याच्या मधोमध जनावरे बसून राहत असल्याने दिवसा आणि रात्री महामार्गावरून धावणा-या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते.परिणामी,वाहने अनियंत्रित सुदधा होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.मुख्य रस्त्यांवर आणि अंतर्गत रस्त्यावंर असलेल्या मोकाट जनावरांमुळे नागरिकांना तसेच शालेय विदयार्थ्यांना याचा त्रास होण्याची शक्यता आहे. जनावरे झुंडीने राहत असल्याने ऐकमंेकांच्या अंगावर धावून जातात. त्याचबरोबर त्यांच्यात लढाया सुदधा होतात. त्यामुळे शाळेत जाणा-या आणि येणा-या विदयार्थ्यांना यापासून मोठा धोका असल्याने स्थानिक पालकांनी मोठी भिती व्यक्त केली आहे.त्यामुळे मोकाट जनावरांचा नगर पालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. मूल ते चंद्रपूर आणि गडचिरोली राष्टीय महामार्गावर मोठया प्रमाणात मोकाट जनावरे बसून असतात.याचा त्रास स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना मोठया प्रमाणात होत आहे.कोणतीही अनुचित घटना घडण्याआधी पालिका प्रशासनाने मोकाट जनावरांना पकडून नगर पालिका अंतर्गत असलेल्या कोंडवाडयात त्यांची रवानगी करावी अशी मागणी होत आहे.पावसाळ्यातच नव्हे, तर बाराही महिने रस्त्यांवरील मोकाट जनावरांमुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या विषयी मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. 


मोकाट जनावरांसाठी एकच कर्मचारी
रस्त्यावरील मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी पालिकेने एकच कर्मचा-याची नियुक्ती केला आहे. संबधित कर्मचारी झुंडीने राहणा-या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करू शकतो काय ? अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे.मोकाट जनावरांना हाकलल्यामुळे रस्त्यांवर पुन्हा त्यातून एखादा अपघात घडण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.त्यापेक्षा पालिकेच्या कोंडवाडयात मोकाट जनावरांची रवानगी करावी अशी मागणी होत आहे.तसेच मोकाट जनावरांच्या मालकांकडून दंडाची रक्कम वसूल करावी अशी मागणी होत आहे.