देशी दारूची विनापरवाना अवैध वाहतूक

106
देशी दारूची विनापरवाना अवैध वाहतूक
34 पेटया पकडल्या
मूल पोलिसांची कामगिरी
2 लाख 11 हजार रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त

मूल:- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशी दारूच्या 34 पेटया पकडल्या.ही कामगिरी मूल पोलिसांनी केली.अवैधरित्या आणि विनापरवाना ही वाहतूक सुरू होती. रॉकेट संत्रा कंपनीची ही देशी दारू होती. मूल ते मारोडा मार्गावरील काटवण टी पाईंट वर नाकाबंदी दरम्यान पांढ-या रंगाच्या मारोती 800 एम एच 27 एच 6050 या क्रमांकाच्या वाहनामध्ये सिलबंद देशी दारूच्या 34 पेटया आढळून आल्या.  या प्रकरणी मूल पोलिसांनी चालक मालक शंकनाथ दिलीप टिंगूसले ,वय 25 वर्षे, आणि त्याचा साथिदार अमन अनिल टिंगूसले वय 22 वर्षे ,रा.मूल या दोन्ही आरोपीं विरूदध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत  गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.  यात एक लाख 36 हजार रूपये किंमतीची देशी दारू आणि पांढ-या रंगाची मारोती 800 असा एकूण दोन लाख 11 हजार रूपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरिक्षक विजय राठोड  यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरिक्षक सुबोध वंजारी यांचे नेतृत्वात  पोलिस हवालदार भोजराज मुंडरे,पोलिस अंमलदार नरेश कोडापे,चिमाजी देवकते,शंकर बोरसरे यांनी केली.मूल पोलिसांच्या कामगिरी मुळे अवैधरित्या दारूची वाहतूक करण्यां-यांचे धाबे दणाणले आहे.