मूल येथील स्मशानभूमीत समस्यांचा डोंगर
सरणासाठी लाकडे उपलब्ध नाही,कच-यांचे साम्राज्य
मूल:- पाच कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या येथील स्मशानभूमीत समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे.याकडे स्थानिक नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी प्रभाकर भोयर यांनी केला आहे.येथिल समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात अन्यथा भाजपातर्फे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मूल पासून तीन किमी अंतरावर उमा नदीच्या पात्रालगत स्मशानभूमी बांधण्यात आली.लोकहिताचा विचार करता स्मशानभूमी बांधकामासाठी पाच कोटी रूपये खर्च करण्यात आले. नदीच्या पात्रात अस्थी विसर्जन करता यावे यासाठी पाय-या सुदधा बांधण्यात आले.एकाच वेळी दोन अंत्यसंस्कार पार पाडता यावे यासाठी दोन शेडचे सुदधा बांधकाम करण्यात आले.परंतु या स्मशानभूमीकडे स्थानिक नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेले सरण येथे उपलब्ध होत नाही. लाकडांचा साठा ठेवण्यासाठी मोठे गोडावून बांधण्यात आले आहे.पंरतु ते आजच्या घडीला बिनकामाचे ठरले आहे.येथे सरण मिळत नसल्याने शोकाकूल कुटंुबीयांना वनविभाग कार्यालयाकडून लाकूड विकत घ्यावे लागते.काही वेेळेला स्थानिक मूल मध्ये सरण उपलब्ध राहत नाही.टंचाईच्या काळात अनेकांना चिचपल्ली,सावली किंवा सिंदेवाही येथून लाकडे आणावी लागतात. त्यासाठी वाहनाचा खर्च आणि इतर गोष्टींचा आर्थिक भार कुटुंबीयाना सहन करावा लागतो.स्मशानभूमीच्या परिसरात झुडपी जंगलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उमा नदीच्या परिसरात वाघाचे दर्शन अनेकांना झाले आहे. यातून एखादी दुर्घटना घटण्याआधी येथील परिसर स्वच्छ करणे गरजेचे असताना सुदधा पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.शोकसभेसाठी बांधण्यात आलेल्या हॉलची,स्वच्छता गृहाची दुरावस्था झाली आहे. अंत्यसंस्कारानंतर हातपाय धुण्याची पदधत आहे.त्यासाठी बसवलेले नळ येथे बंद अवस्थेत आहे. विविध समस्यंानी येथे डोके वर काढले आहे.समस्यांचा डोंगर येथे उभा राहिला आहे.नदी पात्रात अंत्यसंस्कार पार न पाडता जनसेवेसाठी स्मशानभूमी उभारल्या गेली. अशा या स्मशानभूमीत मूल नगर पालिकेने सरणाची सोय उपलब्ध करून दयावी,येथे एक चौकीदार आणि सफाई कामगाराची नियुक्ती करण्यात यावी आणि परिसरातील वाढलेल्या झुडपी जंगलाची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी प्रभाकर भोयर यांनी केली आहे.समस्या तात्काळ निकाली नाही निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
गोडावून असूनही सरणासाठी लाकडे उपलब्ध नाही.मागिल ब-याच वर्षांपासून ही समस्या येथिल नागरिकांना भेडसावत आहे.अंत्यसंस्कारासाठी बाहेरून किंवा वनविभागाकडून विकत लाकडे आणावी लागतात. त्यासाठी लागणारा वाहनाचा खर्च आणि इतर खर्चाचा भार सहन करीत नागरिकांना अंत्यसंस्कार उरकावे लागते.सरणासाठी लाकडे हा महत्वाचा घटकच येथे उपलब्ध नसल्याने या गंभीर समस्यांकडे पालिकेचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.