संपादकीय – मूलच्या गणेशोत्सवाला शतकी परंपरा – चेपाजी पेंटरच्या मंडळाला 106 वर्षे पूर्ण

301
संपादकीय
=======
मूलच्या गणेशोत्सवाला शतकी परंपरा
चेपाजी पेंटरच्या मंडळाला 106 वर्षे पूर्ण

 राजकीय दृष्टया संवेदनशिल,ऐतिहासिक,भौगोलिक,धार्मिक,सामाजीक वातावरणाने संपन्न,डोंगर द-यांनी वेढलेल्या,धबधबा,गायमुख तसेच हिरवेगार,निसर्गरम्य जंगलाने,वाघ,बिबट सह इतर वन्यजीवांच्या अलगद दर्शनाने डोळयांचे पारणे फेडणा-या, भातशेतीच्या शेतशिवाराने नटलेल्या, तांदळाच्या व्यापारासाठी प्रसिदध असलेल्या आणि मुख्य म्हणजे राज्याला दोन दोन मुख्यमंत्री देणा-या  मूलच्या गणेशोत्सवाला शतकी पंरपरा लाभली आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे येथील पंचक्रोशीत चेपाजी पेंटरच्या नावाने प्रसिदध असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळाला 106 वर्षे पूर्ण झाली आहे. यंदाचा गणेशोत्सव पावसात साजरा होत आहे.वरूण राजाची बरसात राहून राहून होत आहे.तरीही भक्तजनांचा उत्साह ओसंडून वाहणारा आहे. सर्वच गणेश मंडळानी स्थापन केलेली गणेश मूर्ती सुबक आणि नयनरम्य आहे. नुकत्याच झालेल्या सिंदूर ऑपरेशनचा देखावा संगम गणेश मंडळाने साकारला  आहे. मूल येथील गणेशोत्सवातील देखावे पंचक्रोशीत प्रसिदध आहेत.ब-याच वर्षापूर्वी रात्री विसर्जन मिरवणूक निघायची.तेव्हा रात्रभर परिसरातील नागरिकांची मिरवणुकीतील देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळायची. सर्वात म्हणजे चेपाजी पेंटर अर्थात चंदू आणि तुळशीराम रामशेटटीवार बंधुनी साकारलेले देखावे अतिशय उत्कृष्ट असायचे. एकेकाळी त्यांनी अमेरिकेतील पंेटागॉन येथे झालेल्या बहुमजली इमारतीवरील विमानाने झालेला अतिरेकी हल्ला याचे दृश्य साकारून अख्या चंद्रपूर जिल्हयाचे लक्ष वेधून घेतले होेते.रामशेटटीवार बंधु मूल येथिल प्रसिदध मूर्तीकार. उत्कृष्ट पेंटर.सुबक आणि वळणदार अक्षर.रामायण,महाभारत काळातील तसेच इतर उत्तम देखावे साकारण्याचा त्यांचा हातखंड. आता त्यांची मूले मूर्तीकार म्हणून प्रसिदध आहेत.आपल्या भेटीत चंदू रामशेटटीवार म्हणाले,आमच्या सार्वजनिक गणेश मंडळाला 106 वर्षे पूर्ण झालीत.1921 ला आमच्या आजोबांनी याची स्थापना केली. त्यानंतर हा वारसा वडील चेपाजी पेंटर यांनी पुढे चालविला.आता आम्ही आणि आमची मूले ही पंरपरा पुढे नेत आहे.गणेश रामशेटटीवार आणि अक्षय रामशेटटीवार यांचाही मूर्तीकलेत हातखंड आहे.गणेशोत्सवाच्या निमित्ताने मूल मध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. विविध सामानाची खरेदी नागरिक करीत असतात.खेडयापाडयातला माणूस परिवारासह आलेला असतो.त्यानिमित्ताने होणारी खरेदी मोठी असते.गणपती विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने इतर व्यवसाय सुदधा भरभराटीला येतो. खेळणी विकण्याच्या व्यवसायावर पोटाची खळगी  भरणारी लोकही या निमित्ताने शहरात दाखल होतात.त्यांच्याही चमकदार खेळणीची होणारी विक्री सुदधा वाखाणण्याजोगी असते.विसर्जन मिरवणुकीत आपल्या आईवडीलांसोबत आलेली पोरं अशा या चमकदार खेळणीकडे आपसुकच वळतात.लक्ष केंद्रीत होतात. आणि त्याच हिशोबाने विक्रेता आपल्या खेळणीची मांडणी करीत असतो किंवा तसे तो आपल्या खेळणीचे कसब सुदधा दाखवितो. लहानश्या भिंगरी पासून तर रबराच्या गुल्याला पर्यंत सर्वच खेळणी विसर्जनाच्या दिवशी आपल्याला रस्त्यांवर दिसायला लागतात. बासरी वाजवायला येवो किंवा न येवो तरीही आपले लक्ष त्या सुमधूर बासरी वादनाकडे जात असते.आपल्या खांदयावर एका बांबूच्या काडीवर शेकडो लहान मोठया बनवलेल्या बासरी पदधतशीरपणे बांधून तो बासरी विक्रेता सर्वांचे लक्ष वेधून घेतो. त्याच्या बासरी वादनाने आपल्याही मनात एक लकेर निर्माण होते.सहजच आपणही हवी ती किंमत देवून बासरी विकत घेतो. त्याच्या सारखे आपणही वाजविण्याचा प्रयत्न करतो.परंतु ते प्रयत्न निष्फळ ठरतात. एकच लांब सूर निघाल्या नंतर आपलाही हसा होतो आणि आपल्यावरही हसणारे वेगळेच असतात,हे वेगळे सांगायला नको.   बासरी वादनाला संगीताचे शिक्षण किती महत्वाचे असते,हे तेव्हा कळून चुकते.असो, या निमित्ताने विक्रेत्यांच्या खेळणींची विक्री होत असते.त्यांच्याही पोटापाण्याचा प्रश्न आहे.अशा उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या व्यवसायाला भरभराटी आलेली असते.ऐरवी त्यांच्या कडे कोण फिरकणार.आणि, ही मंडळीही अशा उत्सवातच आपल्या दिसत असतात. गणेशोत्सव हा सर्वात मोठा उत्सव. हा उत्सव रंगतदार असतो. आधीच्या काळामध्ये मूल मध्ये परत वाघ निघायचा. दोन दोन परत वाघ असायचे. माणसाला हुबेहुब वाघासारखे रंगविलेले असायचे.त्याचा चेहराही वाघासारखा रूबाबदार बनविल्या जायचा. हा परत वाघ सुदधा आमच्या विदयार्थी दशेमध्ये आमचे लक्ष वेधून घ्यायचा.आता परत वाघ निघत नाही.कदाचित कोणी बनायला तयार नसेल किंवा ही कल्पना कोणाच्या डोक्यात येत नसेल.किंवा असेही असू शकते की ,वाघ आता नरभक्षी झाला आहे.जंगलात जाणा-या गुराख्यावर हल्ला करतो,त्याला ठार मारतो.शेतक-यांवर हल्ला करतो,त्याला जीवानिशी मारतो,निंदा काढणा-या महिलेवर हल्ला करतो. असेही कारण असू शकते. यंदा तर वाघाने कहरच केला. असो, आधीच्या काळात मूल मध्ये गणेश मंडळातर्फे ऑकेस्ट्रा,नकला किंवा एखादा मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन होत होते.आता तसे कार्यक्रम होताना दिसत नाही. काळ बदलला.वेळ बदलली. सोशल मिडीयाचा  वापर वाढला. आता नवं स्वीकारलं पाहिजे,पण,जुनं ते सोनं टिकवून ठेवलं सुदधा पाहिजे.बाप्पाच्या चरणी,पुढच्या वर्षी लवकर या म्हणत नव्या जुन्याच्या आठवणीसह मूल मधील गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे दर्शन खास आपल्यासाठी.

श्री.विनायक रेकलवार
मुख्य संपादक- जनतेचा आवाज
8975140998
मूल ( चंद्रपूर  )