मूल नगर पालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसची फळी सज्ज – संतोष रूपी सुदर्शन चक्र कॉंग्रेसला तारणार- नव्या दमाचे शुर शिपाई निवडणुकीच्या मैदानात

208
मूल नगर पालिका निवडणूकीसाठी
कॉंग्रेसची फळी सज्ज
संतोष रूपी सुदर्शन चक्र कॉंग्रेसला तारणार
नव्या दमाचे शुर शिपाई निवडणुकीच्या मैदानात

मूल:- मूल नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे नव्या दमाचे शुर शिपाई ( उमेदवार) मैदानात उतरवले आहे.त्यामुळे कॉंग्रेस मध्ये संतोष मय, चैतन्य,उत्साह,नाविण्यपूर्ण आणि एकतेचे वातावरण आहे.नगर पालिका निवडणुकीत बाजी मारण्याचा निर्धार केला आहे. पालिकेवर कॉंग्रेस पक्षाचा झेंडा रोवण्यासाठी संतोषरूपी सुदर्शन चक्र आणि कॉंग्रेसची फळी त्यासाठी सज्ज झाली आहे. कडकडणा-या गुलाबी थंडीत मूल येथील राजकीय वातावरण आता तापायला सुरूवात झाली आहे.


कॉंग्रेसची पत्रकार परिषद —
नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेवून आपला विजयाचा निर्धार पक्का केला. उमेदवारांचा परिचय यावेळी करून देण्यात आला.मूल नगर पालिकेवर कॉंग्रेसची सत्ता आल्यास नाविण्यपूर्ण बदल घडवून आणू,नगर विकासाच्या मुलभूत समस्या,अडीअडचणी याकडे प्राधान्याने लक्ष पुरवू,पालिका प्रशासनात एक शिस्त आणू असे मत यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष गुरू गुरनूले आणि शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी बोलून दाखविले.लवकर पक्षाचा जाहीरनामा प्रसिदध होत असल्याचे ते पुढे म्हणाले.  यावेळी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता प्रशांत समर्थ आणि नगरसेवक पदाचे उमेदवार ,तसेच बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार,विजय चिमडयालवार,राजेंद्र कन्नमवार, प्रशांत समर्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार रिंगणात —
कॉग्रेस पक्षाकडून प्रभाग 7 अ मधून अनु.जमाती सर्वसाधारण प्रवर्गातून येथील एका प्रादेशिक वर्तमानपत्राचे प्रतिनिधी तथा मूल तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अशोक हिरामण येरमे मूल नगर पालिका  निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपले भवितव्य ते या प्रभागातून अजमावित आहेत.

मूल नगर पालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.