मूल मध्ये कृत्रीम पाणी टंचाई
नगर पालिकाविरोधात असंतोष
नगर पालिकाविरोधात असंतोष
वारंवार पाणी पुरवठा खंडीत
मूल :- येथिल नगर पालिका प्रशासन आणि सत्ताधा-यांच्या आशीर्वादाने येथे कृत्रीम पाणी टंचाईची झळ नागरिकांना सोसावी लागत आहे.दोन दिवसा आड,चार दिवसा आड तांत्रिक कारण सांगून पाणी पुरवठा येथे बंद राहत आहे.महिण्यातून किमान पंधरा दिवस येथील वाढीव पाणी पुरवठा प्रभावीत होत असल्याने नागरिकांमध्ये नगर पालिका प्रशासन आणि सत्ताधा-याविषयी असंतोष व्यक्त होत आहे. दोन वेळेला पाणी पुरवठयाचे आश्वासन सुदधा हवेत विरले गेले आहे.

मूल शहराची लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांच्या मागणी नुसार येथे वाढीव पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली.स्वच्छ,मुबलक आणि दोन वेळेला पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
साठी जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी घरगुती नळावर पाणी रिडींग घेणारे मिटर आणि लावण्यात आले.त्यासाठी नागरिकांकडून अनामत रक्कम सुदधा उकळण्यात आली.परंतु आजच्या घडीला पाणी रिडींग घेणारे मिटर निव्वळ शो पीस ठरले असून फक्त तो एक देखाव्याचा भाग ठरला आहे. हे मिटर कोणत्या कामाचे असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. हा पांढरा हत्ती किती दिवस पोसायचा असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.
पाणी कर नियमित घेत असताना सुरूळीत आणि मुबलक पाणी पुरवठा शहरवासियांना करण्याचा विसर नगर पालिका प्रशासनास पडला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मागिल वर्ष भरापासून तांत्रिक बिघाड,लिकेज दुरूस्ती यासह विविध कारणे देत दोन दिवसाआड,चार दिवसाआड पाणी पुरवठा बंद ठेवल्या जात असल्याने भर उन्हाळयात मूल मध्ये कृत्रीम पाणी टंचाई निर्माण निर्माण झाली आहे. सत्ताधारी,प्रशासन आणि पाणी पुरवठा विभागाने वारंवार खंडीत होणारा पाणी पुरवठा मूल शहरवासियांना मुबलक आणि दोन वेळेला करावा अशी मागणी होत आहे.