जागतिक महिला दिना निमित्त बारा कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
राष्ट्रीय लोकहित सेवा संस्थेचे आयोजन
मूल :- कला , क्रीडा, साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बारा कर्तृत्ववान महिलांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय लोकहित सेवा संस्थेच्या वतीने मूल येथे पत्रकार भवनातील दर्पण वाचनालयात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूरच्या सुपरिचित अधिवक्ता पुनम वाघमारे या होत्या. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्रातील नामवंत महिला, सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका तथा राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे , सावलीच्या सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर निवासी कर्जमुक्ती अभियानाच्या गिता मेहर उपस्थित होत्या . उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारा हा पुरस्कार सहज सुचलंच्या कर्तृत्ववान महिलांसाठी “खास “असल्याचे अधिवक्ता मेघा धोटे यांनी आपल्या भाषणातून आवर्जून सांगितले.कर्जमुक्ती अभियानात महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन गीता मेहर यांनी केले तर अधिवक्ता पुनम वाघमारे यांनी आपल्या भाषणातून कायदे विषयक बाबत मोलाचे मार्गदर्शन या वेळी केले.राष्ट्रीय लोकहित सेवाचा हा सन्मान पुरस्कार प्राप्त करणा-यांत प्रामुख्याने चंद्रपूरच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडक, विदर्भातील सुपरिचित कवयित्री तथा योगा शिक्षिका वैजयंती विकास गहुकर, दुर्गापूर- चंद्रपूरच्या मधूर व गोड आवाजाच्या गायिका उज्वला पद्माकर निमगडे,मूल तालुक्यातील चिरोली येथील आशा वर्कर श्रीमती पौर्णिमा राजेश कीर्तीवार,सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटी भद्रावतीच्या संस्थापक अध्यक्ष कु. किरण विजय साळवी , शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भद्रावती तालुक्यातील शेगांव खूर्द येथील कु .प्रियंका पांडुरंग गायकवाड, पुण्यातील महिला पत्रकार कु. स्नेहा उत्तम मडावी मूल तालुक्यातील चिखलीच्या महिला पोलिस पाटील पुनम सुभाष मडावी, चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील राजूरा येथील योगा शिक्षिका तथा सुपरिचित समाजसेविका सरोज विठ्ठलराव हिवरे , ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या चैताली निलेश आत्राम, बाळापूर तळोधी येथील प्राथमिक स्वास्थ्य आरोग्य केंद्रातील श्रीमती ज्योती संजय इंगळे ,व सोलापूर येथील प्रख्यात चित्रकार कु.रश्मी गजानन पचारे यांना सम्मानित करण्यात आले.
आयोजक दत्तात्रय समर्थ व अर्चनाताई समर्थ यांनी माझ्या कार्याची दखल घेत मला हा सन्मान पुरस्कार बहाल केला असल्याची भावना दिव्यांग उज्वला निमगडे यांनी व्यक्त केली.कार्यक्रम स्थळी उपस्थितीतांनी पुरस्कार प्राप्त ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या प्रियंका गायकवाड यांचे तोंडभरून कौतुक केले तर अनेकांनी चित्रकार रश्मि पचारे यांचे अभिनंदन केले. पत्रकार भवनात आयोजित या कार्यक्रमाला प्रामुख्याने च़ंद्रपूरच्या सुपरिचित कवयित्री सविता कोट्टी -सातपूते ,फर्जना शेख , श्यामला बेलसरे,समता बन्सोड, राधिका बुक्कावार ,सीमा भसारकर, संगिता पाटील, अश्विनी कावलकर, किर्ती शहाने, नाजूका लाटकर,नझिमा महाजन, वाईजा अन्वर शेख,शकीला शेख , शमा शेख सारिका निमगडे यांच्या सह तालुक्यातील महिला व तरुणी उपस्थित होत्या.विशेषता पुरस्कार प्राप्त कर्तृत्ववान महिलांच्या परिवारातील सदस्य या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते.अनेकांनी राष्ट्रीय लोकहित सेवाने यंदाच्या वर्षात आरंभ केलेल्या या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय लोकहित सेवाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ व त्यांच्या अर्धांगिनी सामाजिक महिला कार्यकर्त्या अर्चना समर्थ यांचे अभिनंदन केले.चार तास रंगलेल्या या दिमाखदार पुरस्कार सोहळ्याचे सुरेख संचालन मूल नगरीच्या सुपरिचित सामाजिक महिला कार्यकर्त्या तथा सहज सुचलंच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार व दिलीप गेडाम यांनी केले.