तोतया पोलिस आणि पत्रकाराच्या टोळीस अटक – मूल पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

117
तोतया पोलिस आणि पत्रकाराच्या टोळीस अटक
मूल पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

मूल:- पोलिस आणि पत्रकार असल्याची बतावणी करून खंडणी वसूल करणा-या तोतया पोलिस आणि पत्रकाराच्या टोळीस अटक करण्यात आली.यात एका महिलेचे सुदधा समावेश आहे. बादल दुर्गाप्रसाद दुबे,वय 36 ,रा.भिवापूर चंद्रपूर,संगीता बादल दुबे,वय 27,रा.भिवापूर चंद्रपूर,अजय विजय उईके वय 31 ,रा.चंद्रपूर,देवेंद्र चरणदास सोनवणे रा.चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत.ही कारवाई मूल पोलिसांनी केली.आरोपींनी संगनमत करून तीन जुलै रोजी मौजा चिरोली येथील सुरेश लक्ष्मण गणमेनवार यांच्या घरी जावून भरारी पथकातील पोलिस असल्याचे बतावणी करून विनापरवाना दारू विक्री करीत असल्याचा धाक दाखविला.पंधरा हजार रूप्यांची मागणी केली.तडजोडी अंती दहा हजार रूपये खंडणी वसूल केली. तसेच मौजा डोंगरगाव येथील एजाज शेख ईब्राइम शेख यांच्या अंडा आम्लेट दुकानात जावून दारू पिणारे व्यक्ती आढळून आल्याचा धाक दाखवून पाच हजार रूप्यांची खंडणी वसूल केली. चिरोली येथील सुरेश गणमेनवार यांच्या लेखी तक्रारीवरून तोतया पोलिस आणि पत्रकारांच्या टोळीवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.त्यांचे कडून पंाढ-या रंगाचे चारचाकी वाहन अंदाजे किंमत 12 लाख 50 हजार रूपये,दोन स्मार्ट मोबाईल किंमत 45 हजार रूप्ये आणि नगदी 15 हजार रूप्ये असा एकूण 13 लाख 10 हजार रूप्यांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. मूल पोलिसांच्या तत्परतेने आरोपींना अटक करण्यात आली. पोलिस निरिक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक सुबोध वंजारी,पोलिस हवालदार भोजराज मुंडरे,जमीरखान पठाण,चिमाजी देवकते,नरेश कोडापे,शंकर बोरसरे,संदिप चुधरी यांनी ही कारवाई केली.पुढील तपास मूल पोलिस करीत आहे.