जुनासूर्ला येथील जलजीवनच्या पाणी पुरवठा योजनेची चौकशी करा – सामाजिक कार्यकर्ते गंगाधर इद्दूलवार यांची मागणी

255
जुनासूर्ला येथील जलजीवनच्या पाणी पुरवठा योजनेची चौकशी करा – सामाजिक कार्यकर्ते गंगाधर इद्दूलवार व नागरिकांची मागणी
मूल:- तालुक्यातील जुनासूर्ला येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेत लाखोचा गैरव्यवहार झाला.या योजनेची चौकशी करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर इददूलवार यांनी केली आहे.मूल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत गंगाधर इददूलवार म्हणाले,2023 – 2024 या कालावधीत जुनासूर्ला येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले.सदर काम अपूर्ण असून निकृष्ट दर्जाचे बनविण्यात आले.गावातील सिमंेट रोडची तोडफोड करण्यात आली.त्यामुळे अंतर्गत रोडची दुरवस्था झाली आहे.नागरिकांच्या घरोघरी नवीन नळ कनेक्शनची जोडणी करण्यात आली नाही.योजनेतंर्गत पीव्हीसी पाईप निकृष्ट दर्जाचे टाकण्यात आले.त्यामुळे जागोजागी लिकेजची समस्या निर्माण झाली.शासनाने या योजनेच्या कामासाठी लाखो रूपये खर्च केले.परंतु,पाहिजे त्या प्रमाणात योग्य काम झाले नाही.संबधित कंत्राटदाराने प्रशासनाला आणि जनतेला चुना लावण्याचे काम केले असल्याचा आरोप गंगाधर इददूलवार यांनी केला आहे.जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनेतील निकृष्ट कामाची निःपक्ष चौकशी करण्यात यावी आणि संबधीत कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषदेत गंगाधर इददूलवार यांनी केली. याबाबत गंगाधर इददूलवार आणि नागरिकांनी या योजनेच्या गैरव्यवहाराबाबत चौकशी करण्यासाठी मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना एक निवेदन सादर केले आहे. याबाबत गंगाधर इददूलवार म्हणाले,जुनासूर्ला ग्रामपंचायचे प्रशासकीय अधिकारी,संबधित विभागाचे अधिकारी जलजीवन मिशनच्या या कामाबाबत काही माहिती दयायला तयार नाही.माहिती विचारले असता संबंधित अधिकारी टाळाटाळ करतात. योजनेचे लाखो रूपयांचे काम असूनही कामांच्या संदर्भात साधे फलक सुदधा लावण्यात आले नाही. त्यामुळे या कामात मोठा गैरव्यवहार झाला असल्याची शंका गंगाधर इददूलवार यांनी बोलून दाखविली. पत्रकार परिषदेला स्नेहल मडावी,संजय उपरीकर,संदीप गिरडकर,प्रशांत वनकर उपस्थित होते. योजनेच्या गैरव्यवहाराची आणि निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी नाही झाल्यास उपोषणाचा इशारा गंगाधर इददूलवार यांनी    दिला आहे.