सुरकर विदयालयात वर्ग दहावीच्या विदयार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित

51
सुरकर विदयालयात वर्ग दहावीच्या विदयार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित
कवठी:- कवठी येथील शहिद सुरेश पाटिल सुरकर विदयालयात वर्ग दहावीच्या विदयार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे मुख्याध्यापक के.व्ही.खोब्रागडे हे होते.प्रमूख पाहूणे म्हणून संस्थचे सचिव तुकाराम सुरकर,अल्काताई सुरकर,सरपंच कांताताई बोरकुटे,उपसरपंच राकेश घोटेकार,माजी सरपंच देविकाताई बटटे,माजी पंचायत समिती सदस्य शशीकला म्हशाखेत्री,जि.प.उच्च श्रेणी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नंदीग्रामवार,सहा.शिक्षक चौधरी,व्हि.डी.हजारे,वि.ओ.रेकलवार,कु.एल.के.सलामे,कु.वि.वि.सुत्रपवार उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते का्रंतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन  आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. वर्ग दहावीच्या विदयार्थ्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवून बोर्डाच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करावे,मन लावून अभ्यास करावा. विविध कौशल्यांची संपादणूक करावी.आपल्या अंगी असलेल्या गुणांना चालना देवून ध्येय साध्य करावे. उच्च शिक्षण घेवून गावाचे,समाजाचे,कुटुंबाचे आणि शाळेचे नाव मोठे करावे असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. यावेळी मान्यवरांकडून दहावीच्या विदयार्थ्यांना बोर्डाच्या परिक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. दहावीच्या विदयार्थ्यांनी सुदधा आपल्या मनोगतातून विदयालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमाचे संचालन वर्ग नववीची विदयार्थीनी सीमरन बटटे हिने केले.सानिका शेतकी या विद्यार्थीनी ने मानलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला विदयार्थी ,विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.