जनतेचा आवाज परिवारातर्फे श्लोक वडपल्लीवार याचा सत्कार
शिंपी समाजातील गुणवंतांचा आम्हाला आहे अभिमान
समाजाच्या सेवेसाठी – गुणवत्ता वाढीसाठी
मूल:- येथील न्यूज पोर्टल जनतेचा आवाज परिवारातर्फे शिंपी समाजातील दहावीचा गुणवंत विदयार्थी श्लोक अजय वडपल्लीवार याचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. श्लोक हा घोसरी येथील रहिवासी आहे.त्याचे दहावी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल,नांदगाव येथे झाले.त्याला दहावीत 87.60 टक्के गूण मिळाले आहे. विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होवून श्लोकने शिंपी समाजाचा मान वाढविला आहे.त्याच्या या घवघवीत यशाबददल जनतेचा आवाज न्यूज पोर्टल परिवारा तर्फे रविवारी (ता.25 मे) सन्मान पूर्वक सत्कार करण्यात आला. श्लोक हा अभ्यासू मूलगा आहे. कोणतीही शिकवणी न लावता त्याने घरीच आईवडील आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे.त्याला क्रिकेट खेळण्याची आवड आहे. त्याने मिळवलेले यश शिंपी समाजातील विदयार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. न्यूज पोर्टल जनतेचा आवाज परिवाराने श्लोकच्या घरी जाऊन सत्कार केला. मुख्य संपादक विनायक रेकलवार आणि सहयोगी संपादक गजानन रेकलवार तसेच घोसरी येथील लोकमतचे वार्ताहर सुरेश कोमावार यांच्या हस्ते त्याला गौरवण्यात आले. यावेळी श्लोकचे वडील अजय वडपल्लीवार, आई भारती वडपल्लीवार,वडपल्लीवार परिवारातील अनिल वडपल्लीवार,विजय वडपल्लीवार,रमेश वडपल्लीवार,सौ.उज्वला विजय वडपल्लीवार,तेजस वडपल्लीवार आणि नातेवाईक दत्तात्रय रार्जूेलवार उपस्थित होते. पेढे भरवून त्याचे मनस्वी अभिनंदन करण्यात आले आणि पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विज्ञान शाखेत त्याला करीयर करायचे असल्याचे श्लोकने सांगितले.
समाजाचे आपण काही देणं लागतो. समाजाने आपल्याला मोठे केले.त्या समाजाचे ऋण आपण फेडलेच पाहिजे.त्या उद्येशाने,‘समाजाच्या सेवेसाठी – गुणवत्ता वाढीसाठी ‘ हे ब्रीद ठेवले आहे.त्या माध्यमातून शिंपी समाजातील दहावी बारावीतील गुणवंत यशवंत विदयार्थ्यांचा आई वडीलांच्या स्मृती प्रित्यर्थ सत्कार करण्यात येणार आहे.स्व.श्री.ओमाजी पोशटटी रेकलवार आणि स्व.सिंधुताई ओमाजी रेकलवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्लोकला सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
पारंपारिक व्यवसाय सांभाळून शिंपी समाज आपली प्रगती करीत आहे.मागासलेपणा असल्याने बरेच मूले मूली शिक्षणापासून वंचित राहतात.शिक्षणे घेतले तरी,अर्धवट शिक्षण घेवून रोजगाराच्या शोधात असतात. पुढील शिक्षण घेण्याची त्यांच्यात आवड निर्माण होत नाही.त्या कारणास्तव ,समाजातील विदयार्थी आणि विदयार्थीनींनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे.आपली प्रगती साधली पाहिजे.हा विचारांचा धागा गुंफून ‘समाजाच्या सेवेसाठी – गुणवत्ता वाढीसाठी हे ब्रीद वाक्य ठेवण्यात आले आहे. या प्रेरणादायी उपक्रमाला समाजातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.