शिंपी समाजातील थोर व्यक्तिमत्व – अशोक गजाननराव आक्केवार

514
शिंपी समाजातील थोर व्यक्तिमत्व
अशो
क गजाननराव आक्केवार

शिंपी समाजातील थोर व्यक्तिमत्व श्री.अशोक गजाननराव आक्केवार यांचे वयाच्या 80 व्या वर्षी मंगळवारी (ता.15 जुलै) निधन झाले. शिंपी समाजाच्या जडण घडणीत त्यांचा मोठा मौलाचा वाटा होता. अशोक गजाननराव आक्केवार हे चंद्रपूर येथील सेवादल भवनाचे अध्यक्ष होते.कॉंग्रेस सेवादलाचे एकनिष्ठ अनुयायी.कार्यकर्ते.आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी सेवादलाला वाहून घेतले होते.कॉंग्रेसच्या विचारांशी ते जुळून राहिले. त्यांनी कधीही त्यात तडजोड केली नाही.  अशोक गजाननराव आक्केवार यांना मी आजोबा म्हणत होतो. आमच्या रेकलवार परिवाराशी त्यांचा घनिष्ठ संबध. आमच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी जातीने हजेरी लावली. एकदा सेवादलाचा कार्यक्रम मूल मध्ये असताना त्यांनी सेवादलाची माहिती मला दिली होती.कॉंग्रेस सेवादलाला भरारी देण्याचे काम त्यांनी केले होते.त्यांचे वडील गजाननराव आक्केवार. त्यांना आम्ही नाना म्हणायचो. नाना आणि मी अतिशय जवळीक. चंद्रपूर येथे महाविदर्भ मध्ये उपसंपादक  असताना मी रोज नानांना भेटायचो.नाना उर्फ  गजाननराव आक्केवार स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. नानाचे स्वदेशी, खादी हे तत्व होते. खादीच्या तत्वाचा धागा  अशोक आक्केवार यांनी पुढे चालविला. जपला. चंद्रपूर येथिल गोल बाजारात त्यांचे खादी ग्रामोदयोग भंडार आहे. अशोक गजाननराव आक्केवार यांच्या निधनाने शिंपी समाजाची फार मोठी हानी झाली आहे.ती पोकळी कधीही भरून निघण्यासारखी नाही. शिंपी समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला.किंबहुना ते सक्रीय राहायचे.सुख दुःखात नेहमीच त्यांची साथ राहायची.लग्न कार्यक्रमात त्यांनी मंगलाष्टके म्हटली नाही असा एकही लग्न सोहळा मला तरी आठवत नाही. त्यांच्या खिशात नेहमीच मंगलाष्टके लिहलेला कागद राहत होता.त्यांचा आवाज सुदधा सुरेख,सुंदर आणि छान होता.भारदस्त होता. शिंपी समाजामध्ये त्यांचा शब्द हा मानाचा होता. त्यांच्या शब्द मोडण्याची हिंमत कुणात नसायची. अशोक आक्केवार सर्वांत मिसळायचे. सर्वांची आस्थेने विचारपूरस करायचे.  असा हा हुरहुन्नरी माणूस,सेवादलाचा खंदा कार्यकर्ता मंगळवारी पंचतत्वात विलीन झाला.
भावपूर्ण श्रदधांजली..!!

श्री.विनायक रेकलवार
मुख्य संपादक
जनतेचा आवाज
8975140998