प्रसिदध नृत्यांगणा गौतमी पाटिल म्हणाल्या,एकताताईसह कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा

77
प्रसिदध नृत्यांगणा गौतमी पाटिल म्हणाल्या,एकताताईसह कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा
मूल:- नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकताताई प्रशांत समर्थ यांच्या सह कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांना मतदारंानी निवडून आणा, असे आवाहन प्रसिदध नृत्यांगणा गौतमी पाटिल यांनी केले. मूल नगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने कॉग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.येथील रामलीला भवनाच्या मैदानात प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. एकता ताई या आपल्या हक्काच्या माणूस आहेत.त्या अतिशय प्रेमळ आहेत. मतदारांनी कॉग्रेसला भरभरून मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.तत्पूर्वी,गौतमी पाटिल यांचा मूल नगरात रोड शो  पार पडला.मूलवासियांचा या रोड शो प्रचंड प्रतिसाद लाभला. जाहीर सभेत  बोलताना आ.विजय वडेटटीवार यांनी भाजपाच्या राज्य आणि केंद्रातील सरकारचा खरपूस समाचार घेतला. यावेळी प्रदेश महासचिव संतोषसिंह रावत आणि इतर पदाधिकारी याचंी भाषणे झालीत. सभेला महिलांसह मूल वासियांची प्रचंड गर्दी होती. यावेळी उमेदवारांचा परिचय देण्यात आला.