संपादकीय – मतदार राजा जागा हो – लोकशाहीचा धागा हो

63
संपादकीय


मतदार राजा जागा हो
लोकशाहीचा धागा हो

दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होतात.या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. लोकशाहीचा सण असतो. या उत्सवात मतदारांनी हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे.वयाच्या 18 वर्षावरील सर्वांनाच मतदानाचा अधिकार मिळाला आहे.हा अधिकार आपण राष्टीय कर्तव्य म्हणून बजावला पाहिजे.योग्य उमेदवार निवडण्याचा अधिकार आपल्याच हातात आहे. हा अधिकार संविधानाने आपल्याला प्राप्त झाला आहे. आपले हक्क,कर्तव्य आणि अधिकार बजावताना मतदारांनी आपले डोळे उघडे ठेवून लोकशाहीला मजबूत केले पाहिजे. पाच वर्षे आपल्याला कोणाच्या तरी हाती सत्ता सोपवायची असते.ती सत्ता सोपवताना आपल्याला शहराचा विचार करायला पाहिजे. सर्वांगिण विकास हेच आपले ध्येय असले पाहिजे.मूलभुत सोयी सुविधा सुटल्या पाहिजे. असे अनेक प्रश्न आहेत की,जे दर पाच वर्षांनी पुन्हा आपले डोके वर काढतात. करोडो रूपयांचा निधी खर्च होतो. एकंदरीत ख-या अर्थाने जनतेच्या पैसंाचा चुराडा होतो. प्रश्न का सुटत नाही? हा एक चिंतनीय भाग आहे. मतदारांनी अशा मुददयांवर चिंतन केले पाहिजे. अशावेळी मतदार म्हणून आपल्याला योग्य विचार करणे भाग आहे.म्हणूनच….
मतदार राजा जागा हो
लोकशाहीचा धागा हो.

असे आपल्याला लोकशाहीचा उत्सव अधिक मजबूत करण्यासाठी म्हणावे लागेल.
केवळ खुर्ची साठी सत्ता महत्वाची नाही. खुर्ची साठी सत्ता महत्वाची नाही.जनतेच्या प्रश्नांबाबत आपल्यात किती तळमळ आहे.हे तपासावे लागेल. आपल्याच पक्षाचा झंेडा डौलाने मिरवत राहावा.असे जर एखादया राजकीय पक्षाला वाटत असेल तर,मतदारांनी त्यांचा लेखाजोखा तपासला पाहिजे. एकंदरीत ऑडीट केले पाहिजे. लोकशाहीच्या उत्सवामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फार महत्वाच्या असतात. या उत्सवामध्ये आपण सर्वांनी हिरीरीने सहभाग होवून मतदानाचे कर्तव्य सक्षम,निःपक्ष,निर्भिड पणे बजावले पाहिजे. कारण,लोकशाही मध्ये निवडणुका फार महत्वाच्या आहेत.सगळयानाच त्यांच्या त्यांच्या मनातील गाव विकास साधता आला पाहिजे.त्यासाठी लोकसहभाग अतिशय गरजेचे आहे.‘गाव करी ते राव न करी‘ हे सिदध करून दाखवायचे आहे.लोकशाहीच्या उत्सवासाठी मतदारांना भरभरून शुभेच्छा..!!!