भक्तीभावाने हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा – श्री पश्चिम मुखी हनुमान मंदिरात तीन दिवशीय कार्यक्रम

219
भक्तीभावाने हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
श्री पश्चिम मुखी हनुमान मंदिरात तीन दिवशीय कार्यक्रम

मूल:- मूल येथील विश्राम गृहा जवळ असलेल्या श्री पश्चिम मुखी हनुमान मंदिरात शनिवारी पहाटे मोठया भक्तीभावाने मंत्रोपचाराच्या जयघोषात हनुमानाच्या मूळ स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा  करण्यात आली. यावेळी मूर्तीचे विधीवत पुजन आणि अभिषेक करण्यात आले.पहाटे चार वाजता पासून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सुरूवात झाली. मोठया उत्साहात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. तसेच हवन पुजन,महाआरतीचा कार्यक्रम यावेळी पार पडला. यावेळी श्री पश्चिम मुखी हनुमान मंदिराचे सर्व कार्यकारी सदस्य ,भक्तगण उपस्थित होते. मूल येथील विश्राम गृह परिसरात फार जुने हनुमान मंदिर होते.त्या मंदिराचा जीर्णोदधार करण्यात आला. परिसरातील स्थानिक रहिवाश्यांच्या सहकार्याने भव्य हनुमान मंदिराचे येथे बांधकाम करण्यात आले.शहरातील अनेक भाविकांनी यासाठी तन मन आणि धनाने सहकार्य करीत मंदिर उभारणीस हातभार लावला. मूल मध्ये श्री पश्चिम मुखी हनुमान मंदिर म्हणून प्रसिदध आहे.मंदिर जीर्णोदधार आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा असा तीन दिवशीय कार्यक्रम येथे पार पडत आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी कलश यात्रा काढण्यात आली.तसेच रविवारी पुजा,आरती,भजन गोपालकाला आणि सायंकाळी महाभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमानाचे मंदिर फार जुने असून भाविकांसाठी एक श्रदधेचे ठिकाण बनले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे कार्यकारी सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.