मूल येथे आदिवासी समाजाचा उपवर – वधु परिचय मेळावा तथा सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन
पालकमंत्री ना.प्रा.डॉ.अशोक उईके आणि ना.नरहरी झिरवाड यांची उपस्थिती
मूल:- स्थानिक आदिवासी समाजातर्फे मूल येथे राज्यस्तरीय आदिवासी उपवर – वधु परिचय , सामुहिक विवाह तथा सामाजिक प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.येथील स्व.मा.सा.कन्नमवार सभागृहात एक मार्च रोजी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.मेळाव्याचे उदघाटन अन्न व प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाड यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.प्रा.डॉ.अशोक उईके हे राहणार आहेत. यानिमित्ताने आदिवासी समाजातर्फे पालकमंत्री ना.अशोक उईके यांचा जाहिर सत्कार करण्यात येणार आहे.मेळाव्याला विशेष अतिथी म्हणून खा.प्रतिभा धानोरकर,आ.अभिजीत वंजारी,खा.डॉ.नामदेवराव किरसान,आ.विजय वडेटटीवार,आ.सुधीर मुनगंटीवार,आ.किशोर जोरगेवार,नगराध्यक्षा एकता समर्थ,आ.कीर्तीकुमार भांगडीया,आ.करण देवतळे,आ.देवराव भोंगळे,आ.सुधाकर अडबाले,माजी मंत्री शोभाताई फडणवीस, माजी अध्यक्ष संतोष रावत,माजी समाजकल्याण आयुक्त आर.डी. आत्राम, माजी उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रभू राजगडकर,प्रा.डॉ.श्याम कोरेटी, राजे विरेंद्र आत्राम, प्रमोद बोरीकर,बापूजी मडावी,प्रा.धिरज शेडमाके,विजय कुमरे,कृष्णा मेश्राम,अॅड.संतोष कुळमेथे,डॉ.मधुकर कोटनाके,महिपाल मडावी,मंगला आत्राम,संगीता पेंदाम यांची उपस्थिती लाभणार आहे.मेळाव्याला समाज बांधवांनी मोठया संख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी केले आहे.