वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
सोमनाथ प्रकल्पातील घटना
मूल:- कापूस वेचणीसाठी गेलेली महिला वाघाच्या हल्यात ठार झाली.ही घटना सोमनाथ प्रकल्पाच्या गट नंबर 261 मध्ये असलेल्या शेतशिवारात शनिवारी सकाळी 7.45 वाजताच्या दरम्यान घडली.मृतक महिलेचे नाव सुनिता शामराव भोयर,वय 43 वर्षे,रा.आदर्शखेडा,मारोडा असे आहे.या घटनेने परिसरात खळबळ माजली.वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी गावक-यांनी ठिय्या मांडला.मागण्या पूर्ण होईपर्यंत प्रेत उचलू न देण्याची भूमिका मांडल्याने येथे गोेंधळाची परिस्थिती निर्माण झाली.पोलिस प्रशासनासह वरिष्ठ वन अधिका-यांनी घटनास्थळी दाखल झाले. मागण्या मान्य झाल्याने तब्बल तीन ते चार तासानंतर प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले.
मारोडा येथील आदर्शखेडा येथे राहणारी सुनिता शामराव भोयर ही महिला दिव्यांग असल्याने आपल्या आईवडीलांकडेच राहते.गावातील 50 – 60 महिलांबरोबर शनिवारी सकाळी कापूस वेचणीसाठी सोमनाथ प्रकल्पाच्या परिसरात असलेल्या शेतशिवारात गेली होती.गट नंबर 261 मध्ये भागात कापूस वेचणीचे काम सुरू असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने सुनिता वर हल्ला करून जागीच ठार केले.वाघाचा हल्ला होताच कापूस वेचणी करणा-या इतर महिलांनी आरडाओरड केल्याने वाघाने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली.तो पर्यंत सुनिताचा मृत्यू झालेला होता.घटना गावात माहित होताच गावक-यांनी सोमनाथ प्रकल्पाच्या दिशेने धाव घेतली.खळबळ उडाल्याने गावक-यांनी घटनास्थळीच ठिय्या मांडला. पोलिस प्रशासन आणि वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले.गावक-यंाची समजूत आणि मागण्या मान्य झाल्याने प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले.मृतकाच्या कुटुंबीयांना तात्काळ 50 हजार रूपयांची मदत करण्यात आली.घटनास्थळी बफर झोनचे वनपरिक्षेत्राधिकारी आर.डी.शेंडे,सहा.वनसंरक्षक अधिकारी वाढोरे यांनी भेट दिली. प्रकल्पाची कापसाची शेती मारोडा येथील नेरलवार यांनी ठेका पदधतीने घेतली होती. आजच्या घटनेने पुन्हा एकदा मूल तालुक्यात मानव वन्यजीव संघर्षाची ठिणगी पडली.
सफारी गेट बंद करा – मागणी
चंद्रपूर जिल्हयात मोठया प्रमाणात सफारी गेट सुरू करण्यात आले.त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढत असल्याचा आरोप गावक-यांनी केला.सोमनाथ येथे असलेले सफारी गेट तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.पर्यटनाच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेले हे गेट शेतकरी,शेतमजूरांसाठी घातक ठरत असल्याचा असंतोष गावक-यांनी व्यक्त केला. बफर क्षेत्राला जाळी लावण्यात यावी, कापूस वेचणीसाठी आलेल्या महिला मजूरांना आठ दिवसाची रोजी देण्यात यावी,मजूरांना संरक्षण देण्यात यावे,सरंक्षण जाळी शेतक-यांना उपलब्ध करून देण्यात यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.