गोपालकाला आणि महाभोजनाने मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयाची सांगता

235
गोपालकाला आणि महाभोजनाने मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयाची सांगता
मूल:- येथील विश्राम गृह परिसरात जीर्णोदधार करण्यात आलेल्या  श्री पश्चिम मुखी हनुमान मंदिरात हनुमानाच्या मुळ मूर्तीचे शनिवारी प्राणप्रतिष्ठा करण्यात आले.त्या तीन दिवशीय उत्सव सोहळयाची रविवारी गोपालकाला आणि महाभोजनाने सांगता करण्यात आली. महाभोजनाचा लाभ शहरातील हजारो भाविकांनी घेतला. तत्पूर्वी दुपारी गोपालकाला करण्यात आला.भजनी मंडळीनी जय श्रीराम आणि जय हनुमानाच्या जयघोषात भजन सादर केले.त्यानंतर गोपालकाला आणि आरती झाल्यानंतर महाभोजनाला सुरूवात झाली.यावेळी हजारो भाविकांनी या महाभोजनाचा लाभ घेतला.तीन दिवशीय उत्सव सोहळयात कलशयात्रा,पुण्याई वाचन,गणेश गौरी पुजन,वास्तू मंडप पुजन,मंडप पुजन,हवनपुजन,मूर्तीचे विधीवत पुजन,भजन,आरती इत्यादी कार्यक्रम पार पडले. शनिवारी पहाटे हनुमानाच्या मूळ स्वरूपातील मूर्तीची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. मूल येथील विश्राम गृह परिसरात,वार्ड क्रमांक 11 मध्ये  असलेले श्री पश्चिम मुखी हनुमान मंदिर भाविकांचे एक श्रदधास्थान बनले आहे.पश्चिम मुखी हनुमान मंदिर येथे ब-याच वर्षापासून आहे.याच मंदिरांचा जीर्णाेदधार करण्यात आला.तसेच हनुमानाच्या मूळ मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.भाविकांच्या भक्तीभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा तीन दिवशीय उत्सव सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला.या मंदिराला शहरातील अनेक भाविकांनी भेट देऊन मूर्तीची मनोभावे पुजा करून दर्शन घेतले.श्री पश्चिम मुखी हनुमान मंदिराचे कार्यकारी सदस्य आणि श्री हनुमान भक्तांनी उत्सव सोहळयासाठी अथक परिश्रम घेतले.