संपादकीय — पाऊले चालती गैरकृत्याच्या मार्गाने….

499
संपादकीय

पाऊले चालती गैरकृत्याच्या मार्गाने….

ज्या वयात धैर्य,शौर्य आणि कर्तृत्वाची चुणूक दिसायला हवी,त्या वयामध्ये युवक – युवती,तरूण – तरूणी,विदयार्थी – विदयार्थीनींचे मन भटकताना दिसत आहेत.  अशा बहुतांश युवापिढीचे पाऊले गैरकृत्याच्या मार्गाने चालत असल्याचे निदर्शनास पडत आहे. वयात येताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे,तसे मार्गदर्शन पालकंाकडूनच आपल्या पाल्याला मिळाले तर, पुढील होणारे धोके टाळता येवू शकतात.मधल्या काळात वयात येताना हा उपक्रम राज्य शासनाने शालेय विदयार्थ्यांसाठी राबविला होता.नंतर तो बंद झाला. त्यानंतर विदयार्थींनींनी आपली काळजी कशी घ्यावी याबाबत सायबर गुन्हे शाखेकडून शाळांशाळांत मार्गदर्शन कार्यशाळा राबविण्यात आल्या.एक तक्रार पेटीचा उपक्रम मध्यंतरीच्या काळात होता. असे विविध उपक्रम राबविल्या गेले. आज परिस्थिती पाहता अशा उपक्रमाची खरी गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.  बंद अवस्थेत असलेले उपक्रम पुन्हा एकदा सुरू व्हावेत अशी समाजाची मागणी आहे.एकूणच परिस्थिती पाहता,दर महिण्याला प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक,महाविदयालयीन शाळांमध्ये कार्यशाळा आयोजित करणे काळाची गरज आहे. त्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत विविध धोक्यांची माहिती पोहचणे गरजेचे आहे.

 
भरकटलेल्या युवापिढीला वठणीवर आणण्याचे काम पोलिस प्रशासनाबरोबर पालकांचे आणि सुजाण नागरिकांचे काम आहे.तेव्हाच काहीसा फरक जाणवायला दिसेल.आज आपण हॉय फॉय सोसायटीचा विचार करतो. परंतु, हीच हॉय फाय सोसायटी आपल्याला गैरमार्गाकडे जाण्यास भाग पाडते.प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे.बोलण्याचा अधिकार आहे.लोकशाहीत स्वमर्जीने आचार विचारांचा अधिकार आहे. परंतु,आपले आचार विचार कसे असावेत,आपले राहणीमान कसे असावे,आपण कोणते वस्त्र परिधान करावे,याचा विचार करताना दिसत नाही.फॅशनच्या दुनियेत आज आपण आपली इमेज गमावून बसत आहोत,याचा विचार करताना आपण दिसत नाही.एक मॉडेल आहे.तिची सोशल मिडीयावर नेहमीच चांगलीच चर्चा असते. तिचे अंगप्रदर्शन पाहून आपलीच मान शरमेने खाली टाकावीशी वाटते. 
 
सोशल मिडीया मुळे युवापिढी बरबाद होताना दिसत आहे.याचा गैरवापर वाढला आहे. चार चौघात फेसबुक पहायला भिती वाटते. सोशल मिडीया वरील नको ते व्हिडीओ समाजाला घातक ठरत आहेत. विविध प्रकारचे अॅप्स सहज आपल्याला नको त्या गोष्टी पुरवायला तयार असतात. अशा सोशल मिडीयावर शासनानेच कठोर निर्बंध घालणे महत्वाचे आहे. कडक पावले उचलून कारवाई करण्याची गरज आहे. भरकटलेली युवापिढी जास्तीत जास्त आपला वेळ मोबाईल मध्ये घालवताना दिसतात.युवकांचा घोळकांचा घोळका विविध ठिकाणी निवांतपणे मोबाईल मध्ये रमलेला दिसतो.बागबगिच्यात,सुनसान परिसरात,जंगल मार्गाने जोडपे सर्रासपणे आढळतात. जोडी जोडीने बाईकवरून भरधाव वेगाने धावताना दिसतात. शाळेच्या परिसरात,महाविदयालयाच्या परिसरात येरझारा घालताना दिसतात.यांना पोलिसी खाक्या दाखविणे गरजेेचे आहे. खुलेआम रस्त्यांवर  वाढदिवस साजरा करणे, होळीचे दिवस नसताना सुदधा खुलेआम होळी साजरी  करणे, बागबगिच्यात मुलामुलींच्या घोळक्याने फोटो शुट करणे,यासह विविध  गैरप्रकारांना आळा घालणे काळाची गरज आहे. हे पालकांना समजायला पाहिजे.पालकंाचे दुर्लक्षच विविध गोष्टींना कारणीभूत ठरत असतात हे विसरता कामा नये.सुजाण पालक आपल्या पाल्याकडे बारिक लक्ष ठेवतो.पण,बाकीच्यांचे काय?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
 
युवापिढीमध्ये दिवसंेदिवस व्यसनाधिनता वाढत चालली आहे.यावर अंकूश कोणाचा असेल असे मला वाटत नाही.चरस, गांजा,दारू याच्या आहारी गेलेला युवक पुढे गैरकृत्यास बळी पडतो.चैनीच्या वस्तूंसाठी नको ते कृत्य करून बसतो.लुबाडणूक,फसवणूक आणि चोरी इथपर्यंत त्याची गेलेली मजल किती घातक ठरू शकते.याचा विचारही करण्यास तो सक्षम ठरत नाही.जेव्हा तो सक्षम ठरतो,तो पर्यंत त्याचे आयुष्य अर्धे संपलेले असते. वाढत चाललेले फॅशन आज युवापिढीसाठी घातक ठरू पाहत आहे. डोक्याच्या केसांची रचना चिमण्यांच्या घरटयांसारखी करून आपल्याकडे दुस-यांचे लक्ष वेधण्याचा प्रकार जेवढा वाईट,तेवढाच अशोभनीय सुदधा ठरतो.  बाईक वरून स्टंट मारणे,हावभाव करणे असे कृत्य  जीवितास हानी पोहचवणारे ठरू शकतात.आपल्या बरोबर दुस-याचा जीव वाचवणे महत्वाचे आहे,याचा विचार कोणी करताना दिसत नाही. सामाजिक वातावरण दुषीत होण्यामागचे कारणे अनेक आहेत.त्या कारणांना वेळीच आळा घालणे महत्वाचे आहे. 
 
आज युवा पिढीची शान शौकीन वाढली आहे.चैनीच्या वस्तू वापरण्यावर त्यांचा भर दिसत आहे. आणि त्या साठी वाटेल ते करायला तो पुढे धजत असतो. त्यात अनेकांचे आयुष्य कसे बरबाद होत असतील याचा विचार न केलेलाच बरा.  युवापिढी गैरकृत्यांमुळे बरबाद होण्यास वेळ लागणार नाही. आज सर्वत्र,चाललेला हा प्रकार थांबविण्यासाठी योग्य ती पाऊले टाकणे गरजेचे आहे.  म – महाराष्ट्राचा, म – मुंबईचा आणि म – मूलचा.अशा मूल पासून मुंबई पर्यंत वातावरण सलोख्याचे राखण्यासाठी  आपल्या सर्वांचे प्रयत्न गरजेचे आहे. शालेय विदयार्थी,विदयार्थीनींची सुरक्षा फार गरजेचे आहे.त्यासाठी प्रत्येक शाळा,महाविदयालयात शालेय वेळेत कमीत कमी  एक सुरक्षा गार्ड शाळेच्या गेटवर ठेवणे गरजेचे आहे. राज्य शासनानेही विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. मुलींनीही भावनेच्या आहारी न जाता आपल्या कुटुंबीयांचा विचार करणे  आवश्यक आहे. मुलींनो तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे. प्रत्येकांनी आपल्या कुटुंबीयाचा,समाजाचा,गावाचा विचार निश्चितच करावा. शहरी,निमशहरी आणि ग्रामिण भागात चाललेल्या अशा गैरकृत्याला वेळीच वेसन घालणे काळाची गरज आहे. समाजाला सुशिक्षित करण्यासाठी जनतेचा आवाज बुलंद करू या……!!!

श्री.विनायक रेकलवार
मुख्य संपादक
जनतेचा आवाज

8975140998