स्वच्छता गृहातील उग्र वासाने प्रवासी बेजार
मूल बसस्थानक,सफाई कर्मचारी गायब
मूल:- येथील बसस्थानकातील स्वच्छता गृहामुळे प्रवासी बेजार झाले आहे.उग्रवास येत असल्यामुळे प्रवास्यांच्या आणि कर्मचा-यांच्या नाकीनऊ येत आहे.सफाई कर्मचारी गायब झाल्याने ही परिस्थिती येथे ओढवली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली रोडवरील मूल बसस्थानक हे मध्यवर्ती बसस्थानक आहे.शेकडो प्रवासी येथून प्रवास करतात.बसची वाट पाहत़ बसणा-या प्रवास्यांना नाकावर रूमाल किंवा पदर घेवूनच बसावे लागते.स्वच्छता गृहातील उग्रवास सर्वत्र पसरत असल्याने प्रवास्यांचा जीव घुटमळल्या सारखा होत आहे.येथे काम करणा-या एस टी महामंडळाच्या कर्मचा-यांना सुदधा या उग्रवासाचा सामना करावा लागत आहे. या उग्रवासातच आम्हाला काम करावे लागते असे येथिल एका महिला कर्मचा-याने आपबिती सांगितली.बसस्थानकावरील स्वच्छतेचा कत्रांट मिळालेला कत्रांटदार या साफसफाई कडे दुर्लक्ष करीत असल्याचे कर्मचा-यांचे म्हणणे आहे.त्यामुळे नेमलेला सफाई कर्मचारी सुदधा गायब झाल्याचे बोलल्या जाते. करोडो रूपये खर्च करून बांधलेल्या बसस्थानाकावर प्रवास्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने प्रवास्यांची एस टी महामंडळाविषयी असंतोष व्यक्त केला आहे.येथील स्वच्छता गृह आणि परिसराची स्वच्छता करण्यासाठी नियमित सफाई कामगार नेमण्यात यावा अशी मागणी होत आहे.


