Home
Home Breaking News वाढदिवसाच्या निमित्ताने- लोकनेत्या संध्याताई गुरनूले

वाढदिवसाच्या निमित्ताने- लोकनेत्या संध्याताई गुरनूले

5

वाढदिवसाच्या निमित्ताने

लोकनेत्या संध्याताई गुरनूले

काही माणसांच्या नशिबात इतका राजयोग लिहला असतो की,ते व्यक्ती कधीही मागे वळून बघत नाही.त्यांची राजकीय कारकीर्द सदैव फुलत असते. हार मानणे या साठी ते कधीही तयार नसतात.जिंकणे ऐवढेच त्यांना माहित असते. अशा प्रगल्भवान लोकांना जनतेचे प्रेम ओतंबून मिळत असते.राजकारणात आपला ठसा  कायम ठेवायचा असेल तर, त्यासाठी लोकांचे प्रेम सुदधा तेवढेच महत्वाचे असते. जनता अशा लोकांच्या पाठिशी आणि असे लोकप्रतिनिधी जनतेच्या पाठिशी खंभीरपणे उभे असतात. असे राजकीय व्यक्ती सदैव लोकहिताचाच विचार करतात.लोककल्याणाचा ध्यास त्यांच्या मनात चाललेला असतो. जनतेचा आवाज त्यांच्या पाठिशी नेहमीच असतो. जनतेच्या हाकेला धावून जाणे,रंजल्या गांजल्यांची सेवा करणे, हा मुख्य उददेश त्यांच्या हातून साध्य होत असते.जनसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदाला ते साजेसे काम करीत असतात. अशा राजकीय आणि सामाजिक वातावरणात उत्कृृष्ट,उत्तम,दिलदार आणि मनापासून  काम करणा-या लोकनेत्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरनूले. संध्याताई भारतीय जनता पार्टी आणि माळी समाजाचे दमदार नेतृत्व करीत आहेत.
संध्याताई रूपेश्वर गुरनूले असे त्यांचे पूर्णनाव.मूल तालुक्यातील फिस्कुटी हे त्यांचे मुळ गाव.आता त्या मूल मध्ये स्थायिक झालेल्या आहेत. 15 जून 1962 ही त्यांची जन्मतारीख.त्यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. मारोडा राजोली या क्षेत्रातून त्यांनी पहिल्यादांच जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली.त्यात त्या विजयी झाल्या.चिरोली केळझर या जि.प.क्षेतातही त्या विजयी झाल्या.गडीसूर्ला बेंबाळ या क्षेत्रातही त्यांनी जि.प.निवडणूक जिंकल्या.परत त्यंानी मारोडा राजोली या क्षेत्रात बाजी मारली. दमदार आणि लढावू व्यक्तीमत्व असल्याने त्यांच्या वाटयाला नेहमीच जनतेचे प्रेम  आले.त्यामुळे त्यांनी मूल तालुक्यातील तीनही जिल्हा परिषद क्षेत्रात कायम बाजी मारत राहिल्या. 1997 ते 2002,2002 ते 2007, 2007 ते 2012, 2012 ते 2017, 2017 ते 2022 असा त्यांचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रवास गौरवास्पद व लौकीकप्राप्त राहिलेला आहे.1999 ते 2002  या काळात त्या चंद्रपूर  जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती होत्या. 2014 ते 2017 आणि 2020 ते 2022 या कार्यकाळात त्यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भूषविले आहे.त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्हयात साजेसे काम करीत जिल्हयाचे नाव उंचावले आहे.

 एक महिला म्हणून त्या भाजपात पक्षाची जबाबदारी उत्तम निभावित आहेत.त्यामुळे पक्षातील वरिष्ठ मंडळी सुदधा त्यंाच्या कार्यावर खुश असल्याचे त्या नेहमीच सांगतात.
लोकनेत्या म्हणून संध्याताई गुरनूले यांचे कार्य गौरवास्पद आहे.मूल तालुक्यात आणि चंद्रपूर जिल्हयात त्यांनी आपला वेगळाच ठसा उमटविला आहे.त्यांचा चाहता वर्ग भरपूर आहे. ग्रामिण भागात त्याही पेक्षा मोठा चाहता वर्ग त्यांचा आहे. सातत्याने त्या आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रात भेटी देत असतात.त्यांचे प्रश्न समजून घेत असतात. नेहमीच त्या जनतेच्या हाकेला धावून जात असल्याने त्यांच्या कीर्तीत सातत्याने भर पडत आहे.राजकारणात त्यांनी आपली वेगळीच छाप पाडली आहे.त्यांचे भाषण अभ्यासू असते.त्यांची वाणी उत्कृष्ट असल्याने रूबाबदारपणे त्या आपले म्हणणे मांडत असतात.सर्वांनाच त्या आपलेसे मानतात. म्हणूनच लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे कार्य जनतेच्या मनात घर निर्माण करणारे आहे.

 समाजकारण आणि राजकारणात त्या नेहमीच यशस्वी ठरलेल्या आहेत.जनतेचे प्रश्न तातडीने सोडविण्याची किमया त्यांच्या शब्दात आहे.त्यांच्या हातात आहे. लोकनेत्या म्हणून संध्याताई यांच्या कार्याला सलाम. त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा..!! त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न लोकांच्या आशीर्वादाने लवकरच पूर्ण होवो ही वाढदिवसानिमित्त सदिच्छा …..!!!

श्री.विनायक रेकलवार
मुख्य संपादक
जनतेचा आवाज
8975140998 

Don`t copy text!