आईच्या कष्टाने फुलले लेकराचे डॉक्टरकीचे शिक्षण
एका संघर्षमय कष्टाची आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी
मूल:- विनायक रेकलवार
एखादया चित्रपटाची स्टोरी व्हावी:- काबाडकष्ट करून आपल्या संघर्षमय जिददीतून एका मातेने आपल्या लेकराला डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करण्यापर्यत प्रयत्न करावा.ही कहाणी एखादया मराठी चित्रपटाची स्टोरी व्हावी अशीच घडली आहे.दोन्ही मूले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करतात.ही समाजासाठी गौरवाची बाब आहे.एक मुलगा एमबीबीएस आणि दुसरा बी फॉर्म होणे हे आईसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. पितृ छत्र हरपल्यानंतर संघर्षातून वाट काढीत दोन निरागस गोंडस चेह-यांना उच्च शिक्षणाच्या प्रवासापर्यंत पोहचवणे हे अभिमानास्पद आणि गौरवास्पद ठरणारे आहे.जगण्याचे बळ कसे असावे याचे हे प्रखर उदाहरण आहे.
एका संघर्षमय कष्टाची आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी
मूल:- विनायक रेकलवार
जीवनात आलेल्या हाल अपेष्टांना बाजूला सारून एका आईने काबाडकष्ट करून आपल्या लेकराचे डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले.त्या कष्टाचे चिज म्हणून मुलानेही रात्रंदिवस अभ्यास करून आपल्या अफाट ज्ञानाच्या जोरावर एमबीबीएसची पदवी प्रथम श्रेणीत उतीर्ण केली. मुलाचे सर्वत्र अभिनंदन होत असताना त्या मातेचे सुदधा कौतुक सर्वत्र होत आहे. एका संघर्षमय जिददीची प्रेरणादायी कहाणी अनेकांसाठी आदर्शव्रत ठरावी अशीच घडली आहे. डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या मुलाचे नाव अभिनय विठठलराव बोथले.तर,त्याला त्या प्रवासापर्यंत नेणा-या आईचे नाव श्रीमती विभा विठठलराव बोथले असे आहे. अभिनय हा मोठा मुलगा.हा अडीच वर्षाचा आणि लहान मुलगा सहा महिण्याचा असताना 2004 मध्ये यांच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपले.वडील एस टी महामंडळामध्ये नोकरीला होते.आईला अनुकंपाच्या नोकरीसाठी चार वर्ष वाट पहावी लागली. या चार वर्षाच्या संघर्षाच्या काळात आईने काबाटकष्ट केले.नातेवाईकांनी झिडकारले.परंतु,मुलांवरील संस्कार तसूभरहीकमी पडू दिले नाही. पतीच्या निधनानंतर त्यांना अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले.दुस-यांच्या शेतशिवारात पोटच्या पोरांसाठी कष्ट उपसावे लागले. जीवनातील संघर्षाला कंटाळताना त्यांनी अनेकदा तलाव आणि विहीरीमध्ये आत्महत्तेचा प्रयत्न केला.पण,त्यांच्या मागे रडत रडत येणारे दोन गोंडस निरागस चेहरे त्यांना लढण्याची प्रेरणा देवून गेले.त्याच प्रेरणेतून त्यांनी जिददीने आपल्या दोन्ही मुलांना वैद्यकीय शिक्षणापर्यंत घडविले. 12 वी पास असलेल्या श्रीमती विभा या एस टी महामंडळामध्ये 2008 मध्ये वाहतूक नियंत्रक म्हणून लागल्या.मूल बसस्थानकावर त्या आज पासेस विभागामध्ये काम करीत आहेत. अभिनयच्या वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी आपले व्याहाड खुर्द येथील राहते घर विकले.मुलाने शैक्षणिक कर्ज काढले. तसेच एस टी महामंडळाच्या सोसायटीमधूनही ढिगभर कर्ज काढून त्यांनी मुलाचा एमबीबीएसचा प्रवास पूर्ण केला.त्यांनी मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी कुठेही कमी पडू दिले नाही. मोठा मुलगा एमबीबीएस झाल्याचा आनंद आईला आहे.आता तो एम एस करणार असल्याचे आईने मोठया गौरवाने सांगितले. लहान मुलगा डी.फार्म नंतर बी फार्मचे शिक्षण पूर्ण करीत आहे. गरीबीत जीवन जगलेल्या मुलांनी आपल्या हुशारीवर उच्च शिक्षण पूर्ण करीत असल्याचा अभिमान त्या मातेला आहे. पितृ छत्र हरपल्यानंतर आईच्या ममतेने एकटीने मुलांना घडविणे सोपे नाही. त्याच मातेच्या डोळयातील शब्दागणिक असलेले आनंदाश्रू आत्ता पर्यंत सोसलेल्या दुःखांवर फुंकर घालण्यासाठी कमी पडतात. मुलांना आईच्या कर्तृत्वाची जाणीव आहे. म्हणूनच मुलांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करीत आईला सुखात ठेवण्याचे रिटर्न गिप्ट दिले आहे. मराठी शाळेतील,मराठी माध्यमातील मूले उच्च शिक्षणापर्यंत भरारी मारण्यात कुठेच कमी नाही,याचे हे ज्वलंत उदाहरण ठरावे.
शिक्षण प्रवास :-
डॉ.अभिनयचे प्राथमिक शिक्षण आईचे माहेर असलेल्या व्याहाड खुर्द येथिल प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण शरदचंद्र पवार हायस्कूल येथे पूर्ण केले. दहावीत सावली तालुक्यातून प्रथम आलेल्या अभिनयने अकरावी आणि बारावीचे शिक्षण नवभारत विदयालय,मूल येथून पूर्ण केले.डॉक्टरच बनणार हे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या अभिनयला कोरोनातील लॉकडाउनचा फटका बसला.त्यामुळे खासगी क्लासेसच्या भानगडीत न पडता घरीच अभ्यास करून प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली.डॉ. उल्हास पाटिल मेडीकल कॉलेज,जळगाव येथे प्रवेश मिळाला.याच मेडीकल कॉलेज मधून त्याने प्रथम श्रेणीत एमबीबीएस उत्तीर्ण केले. इतर कोणत्याही भानगडीत न पडता केवळ अभ्यासावर फोकस करीत मिळवलेले त्याचे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावे.एमबीबीएसला चार पेपर जास्तीचे असतानाही अकरा विषयांच्या पेपरात एका ग्रामिण विदयार्थ्याने गाठलेली उंची कौतुकास्पद ठरली आहे.आत्मविश्वास,जिदद,अभ्यास आणि गरीबीची जाणीव आणि आईचे कष्ट यामुळे प्रत्येक सत्रात त्याला अनमोल यश मिळत गेल्याचे आई गौरवाने सांगते. जळगाव येथेच डॉ.अभिनयचे इंटर्नशिप सुरू झाले आहे. पुढे एम एस करून समाजाच्या सेवेसाठी वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग व्हावा असा त्याचा उददेश आहे.