Home
Home Breaking News कृषी निविष्ठा खरेदी करताना पक्के बिल घ्या – टाळाटाळ करणाऱ्या विक्रेत्यांवर होणार...

कृषी निविष्ठा खरेदी करताना पक्के बिल घ्या – टाळाटाळ करणाऱ्या विक्रेत्यांवर होणार कठोर कारवाई

6

कृषी निविष्ठा खरेदी करताना पक्के बिल घ्या
टाळाटाळ करणाऱ्या विक्रेत्यांवर होणार कठोर कारवाई
मूल :- खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांनी बी-बियाणे रासायनिक खते किंवा इतर कृषी निविष्ठांची खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडून पक्के बिल घेणे अत्यंत आवश्यक आहे. बिल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या किंवा नकार देणाऱ्या दुकानदारांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार यांनी केले आहे.
कोणत्याही विक्रेत्याने पक्के बिल देण्यास नकार दिल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ तालूका कषी कार्यालयात तक्रार करावी .दोषी आढळल्यास संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात यईल.
निकृष्ट अथवा बोगस बियाण्यांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी कायदेशीर पुराव्याची गरज असते. पक्के बिल नसल्यास नुकसान भरपाई मिळविण्यात अडचणी येतात. पक्क्या बिलामध्ये विक्रेत्याचे नाव व परवाना क्रमांक, कंपनीचे नाव बॅच क्रमांक, अंतिम तारीख,प्रमाण. दर आणि खरेदीची तारीख. या बाबी असणे आवश्यक आहे. दरवर्षी बोगस बियाण्यांबाबत तक्रारी येतात मात्र बिल
नसल्याने कारवाई करणे कठीण होते. पीक उगवणीत अडचण आल्यास हे बिलच महत्त्वाचा दस्तऐवज ठरते. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि बोगस निविष्ठांना आळा घालण्यासाठी खरेदीवेळी पक्के बिल घेणे ही काळाची गरज असल्याचे कृषि विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते व कीटकनाशक संबंधी तक्रारीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुल येथे तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. बोगस बियाणे, खते व कीटकनाशके आढळल्यास कार्यालयास संपर्क साधावा.
शुभम उ.किरमिरवार (कृषी अधिकारी गुण नियंत्रण निरीक्षक), तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुल

-: युरिया, डिएपी यांसारख्या अनुदानित खतांबरोबर दुसरे खत व औषधी घेण्यास भाग पाडले जात असेल तर शेतकऱ्यांनी स्पष्ट नकार द्यावा व लिंकिंग ला नाही म्हणावे. तरी खत घेण्यास टाळाटाळ करत असल्यास कार्यालयास संपर्क करावा.
कु. मनीषा बा. राजनहिरे
कृषि अधिकारी ( गुण नियंत्रण निरीक्षक) पंचायत समिती, मुल

Don`t copy text!