घरगुती गणेश स्पर्धेत ऑपरेशन सिंदूर देखाव्याला प्रथम बक्षिस
अविनाश बंडावार यांची कल्पकता
मूल:- घरगुती गणेश स्पर्धेत येथील रहिवासी अविनाश बंडावार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.त्यांनी ऑपरेशन सिंदूर देखावा उभारला होता.नुकतेच बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बंडावार यांचा सत्कार करण्यात आला.ही स्पर्धा भारतीय जनता पार्टीने आयोजित केली होती. पहलगाम येथे अतिरेक्याकडून 27 भारतीय पर्यटकांची हत्या करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने ऑपेरशन सिंदूर ही मोहिम राबविली होती.या घटनेला अविनाश बंडावार यांनी आपल्या कल्पकतेने आकार दिला. ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैनिकांनी बजावलेली कामगिरी देखाव्याच्या रूपाने त्यांनी सादर केली.एक प्रकारे त्यांनी भारतीय सैनिकांना घरगुती गणेश स्पर्धेच्या निमित्ताने सलाम केला.बंडावार यांची मुलगी देखाव्यात सोफीया कुरेशी म्हणून दाखविण्यात आली होती.चंद्रकोरीवर विराजमान झालेले गणेशजी अलगद आकाशात तरंगतानाचे दृश्य होते. हा देखावा परिक्षकांच्या नजरेत भरल्याने त्यांनी त्यांच्या कृतीला प्रथम क्रमांक दिला.मूल येथील मा.सा.कन्नमवार सांस्कृतिक सभागृहात शनिवारी पार पडलेल्या बक्षिस वितरण कार्यक्रमात 5555 रूपयंाचे प्रथम बक्षिस देवून आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अविनाश बंडावार,त्यांची पत्नी उज्वला बंडावार,दोन मूले उर्वेश आणि पर्णवी यांनी बक्षिस स्वीकारले.रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे बक्षिसाचे स्वरूप होते. तसेच संगम गणेश मंडळास सुदधा 21111 रूपयांचे प्रथम बक्षिस प्राप्त झाले. अविनाश बंडावार यांच्या कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मागिल वर्षी सुदधा घरगुती गणेश स्पर्धेत बंडावार यांना दुसरा क्रमांक प्राप्त झालेला होता.