रेल्वे बोगदयातील पाण्यात बुडाली बस
नादुरूस्त बस होती उभी,ढगफुटी सदृश्य पावसाने केला घात
मूल:-ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे रेल्वे बोगदयातील पाण्यात एसटी बस बुडाली. सायंकाळी ही बस परतीच्या मार्गावर मूल कडे येत असताना बोगदयात नादुरूस्त झाली होती. ही घटना मूल पासून तीन किमी अंतरावर असलेल्या चिचोली गावाजवळ घडली.शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. शनिवारी दुपारी क्रेन मशिनच्या साहायाने बसला बोगदयातील पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले. नागरिकांच्या वहिवाटीसाठी रेल्वे प्रशासनाने बांधलेले बोगदयंाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळयाच्या दिवसात या रेल्वे बोगदयामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक,शारीरिक आणि आर्थिक त्रास भोगावा लागतो. प्रसंगी रेल्वे बोगदे नागरिकांसाठी घातक ठरू पाहत आहे. याकडे तालुका प्रशासन,रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे. मात्र,या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. .मात्र,चिचोली ते करवन काटवन गावातील वहिवाट करणा-या नागरिकांना,शालेय विदयार्थ्यांना मोठा फटका बसला. चिचोली गावाजवळील रेल्वे बोगदयात नेहमीच माणूसभर पावसाचे पाणी साचते.गावक-यांना रेल्वे रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास करावा लागतो. वारंवार तालुका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करूनही उपाययोजना कडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे.शुक्रवारी दुपारी मूल बसस्थानकावरून प्रवासी घेवून चिचोली,करवन काटवन,मारोडा आणि भादूर्णी अशा मार्गाने एमएच 40 एन 9426 या क्रमांकाची एसटी बस धावली.सायंकाळी बसचा परतीचा मार्ग हाच होता.करवन काटवन मार्गे येत असताना चिचोली गावाजवळील रेल्वे बोगदयाच्या उतारावर नेमकी बस नादुरूस्त झाली.त्यामुळे चालकाने प्रवाश्यांना उतरवून बस तिथेच उभी केली. सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान चालक आणि वाहकाने सुदधा मूल बसस्थानक गाठून बस नादुरूस्त झाल्याची माहिती दिली. परंतु , शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान ,मूल आणि परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला.त्यामुळे मोठया प्रमाणात पावसाचे पाणी रेल्वे बोगदयात साचले आणि त्यात बस सुदधा बुडाली. अचानक पणे झालेल्या या घटनेने महाराष्ट राज्य परिवहन महामंडळामध्ये खळबळ उडाली. मंडळाचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी घटनास्थळावर पोहचून परिस्थितीची पाहणी केली. क्रेन मशिन आणून शनिवारी दुपारपर्यंत या बसला बोगदयातील पाण्यातून काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. यावेळी परिसरातील गावक-यांची मोठी गर्दी होती. शुक्रवारी दुुपारी याच मार्गावर एक रूग्णवाहिका सुदधा अडकली.तिलाही प्रशासनाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
रेल्वे बोगदयामुळे नागरिकांना त्रास:– चिचोली या गावाजवळून गोंदीया – बल्लारशा रेल्वे मार्ग गेला आहे.रेल्वे मार्ग ओलांडताना अपघाताची घटना होवू नये या उददेशाने रेल्वे बोगदा तयार करण्यात आला.मात्र हा बोगदा सदोष असल्याने या भागातील आदिवासी बहूल करवन आणि काटवन तसेच चिचोली येथील रहिवाश्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.पावसाळयात माणूसभर पाणी साचून राहत असल्याने येथील रहिवाश्यांना आणि वाहनचालकांना आपली वहिवाट रेल्वे मार्ग ओलांडून करावी लागते.असा प्रवास जीवघेणा असल्याने परिसरातील नागरिकांनी तालुका प्रशासन,रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना वारंवार तक्रारी सादर केल्या.परंतु,त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविण्यात आल्याने नागरिकांना जीव मुठीत घेवून आपला प्रवास करावा लागत आहे.या परिसरात घनदाट जंगल असल्याने येथे नेहमीच वाघ,बिबट आणि इतर वन्यप्राण्यांचा मोठा संचार आहे.वाघाच्या हल्ल्यात चिचोली,करवन आणि काटवन येथील शेतकरी आणि गुराख्यांचा बळी गेलेला आहे.संवेदनशिल भाग असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष शेवटी बोगदयातील पाण्यात बस अडकण्यापर्यंत झाले. बोगदयामुळे शालेय विदयार्थ्यांना आणि तालुक्याच्या ठिकाणी ये जा करणा-या गावक-यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.तात्कळ योग्य उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.