भरमसाठ सफारी गेट मुळे जंगलातील वाघ असुरक्षित
वनविभागाचे दुर्लक्ष – माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचा आरोप
मूल:- जिल्हयातील भरमसाठ सफारी गेट मुळे जंगलातील वाघ असुरक्षित झाले आहेत.याबाबत वनविभागाला अभ्यास नाही,त्यांचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी केला.येथील फडणवीस वाडयात स्थानिक पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. चंद्रपूर जिल्हयातील 93 गावांनी विरोध केल्या नंतरही वनविभागाने बफर क्षेत्र घोषीत करून तेथिल नागरिकांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्हयात आधी 8 सफारी गेट होते.तेव्हा वाघांची संख्या सुदधा कमी होती. आता 28 सफारी गेट निर्माण करून पैसा कमविण्याच्या मागे वनविभाग लागला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.वाढत्या सफारी गेट मुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ असुरक्षित झाला आहे.मोठया प्रमाणात पर्यटक वाघाच्या शेजारी जावू लागल्याने वाघाने आपली जागा बदलवली.तो गावात आला.शेतशिवारात आला. निष्पाप असलेल्या शेतकरी,शेतमजूर आणि गुराख्यांवर हल्ले करू लागला. वाघाच्या वाढत्या हल्ल्यंाचे मुळ कारण हे असल्याचे शोभाताई फडणवीस म्हणाल्या. 2021 ते 2024 या चार वर्षात वाघाच्या हल्ल्यात 147 आणि बिबटयाच्या हल्ल्यात 99 जणांचा बळी गेला.यातील जास्तीत जास्त बळी चंद्रपूर जिल्हयातील आहेत. यावर सरकारचे 22 कोटी 5 लाख रूपयांचा निधी कुटुंबीयांच्या मदती साठी वापरला गेला आहे. वाघाच्या वाढत्या हल्ल्यांबाबत वनविभागाला अभ्यास नाही.त्यांचा जंगलाशेजारी असणा-या गावातील जनतेशी संवाद नाही.उपाययोजनेबाबत बैठका नाही. करमणुकीच्या नावाखाली गेट वाढवून पैसा कमविण्याच्या मागे वनविभाग लागला आहे. सातत्याने त्यांचे होणारे दुर्लक्ष याला कारणीभूत असल्याचा आरोप शोभाताई फडणवीस यानी यावेळी केला.
वनविभागाकडे मागणी:- वाघ आणि बिबटयाच्या वाढत्या हल्ल्यांबरोबर हरीण,बंदर आणि रानडुकर अशा वन्यजीवांचा सुदधा उपद्रव मोठया प्रमाणात आहे.नागरिक जेरीस आले आहे. वनविभागाने या वन्यजीवांच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी जंगलात फळांची झाडे लावावीत,गावाच्या शेजारी बांबूचे जंगल उभारावेे, चंद्रपूर जिल्हयातील वाघांची मागणी इतर राज्याने केल्यास वनविभागाने त्याला सहमती दर्शवावी,बिबटयांच्या नसबंदीचा कार्यक्रम हाती घ्यावा जिल्हयात स्थायी पशुवैद्यकीय अधिका-यांची नेमणूक करावी,अतिरिक्त रेस्कू सेंटर उभारावे आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पात नवीन गेटला परवानगी देण्यात येवू नये अशी मागणी वनविभागाकडे मांडण्यात आल्याचे माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी सांगितले.या सर्व मागण्यांना वनमंत्री ना.गणेश नाईक यांनी हिरवा कंदिल दाखविला असल्याचे त्या म्हणाल्या.
वाघांची संख्या:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला 1307.598 चौरस किमी इतके जंगल लाभले आहे.या विस्तीर्ण जंगलात सद्यस्थितीत 350 जवळपास वाघ आहेत. याआधी 2014 मध्ये जिल्हयात वाघांची संख्या 45 होती.चंद्रपूर जिल्हयात वाघाची लोकसंख्या 8.7 टक्के इतकी आहे.राज्यात वाघांची संख्या 2006 मध्ये 103, 2010 मध्ये 190, 2014 – 190, 2018 – 312, 2022 मध्ये 444 इतकी आहे.तर,बिबटयाची संख्या 2018 मध्ये 1690 आणि 2022 मध्ये 1985 इतकी होती.
प्रतिक्रिया
चंद्रपूर जिल्हयात वाघांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.वाघ गावात येवून निष्पाप व्यक्तींवर हल्ला करीत आहे.त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचत आहे.हा संघर्ष टाळण्यासाठी ताडोब्यातील वाघ इतर राज्यात पाठविण्याची हालचाली राज्य शासन स्तरावर सुरू आहे.वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच इतर अनेक मागणीसाठी वनमंत्री ना.गणेश नाईक यांच्या कडे निवेदन सादर करण्यात आले आहे.याबाबत माझ्या उपस्थितीत सहयाद्री अतिथिगृहात वनमंत्री,वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत एक बैठक सुदधा पार पडली.
— शोभाताई फडणवीस,माजी मंत्री,मूल