अगं अंग सुनबाई …..काय म्हणताय सासूबाई…
या मराठी चित्रपटात
प्रकाश पाटिल मारकवार जिल्हा न्यायधिशांच्या भूमिकेत
मूलः- तालुक्यातील राजगड येथील चित्रपट निर्माता प्रकाश पाटिल मारकवार यांनी आपल्याच अगं अगं सुनबाई…. काय म्हणता सासूबाई… या मराठी चित्रपटात जिल्हा न्यायधिशांची भूमिका साकारली आहे.एका दाम्पत्याला न्याय देण्याच्या भूमिकेत ते दिसणार आहेत.त्यांच्या अभिनयाचे चित्रीकरण नुकतेच मुंबई येथे झाले. चित्रपटाचे चित्रीकरण 75 टक्क्यांच्या वर झालेले आहे. हा चित्रपट 16 जानेवारी 2026 रोजी सर्वत्र प्रदर्शीत होणार आहे. अगं अगं सुनबाई… काय म्हणताय सासुबाई… या चित्रपटाचे निर्माते स्वतः प्रकाश पाटिल मारकवार आणि डॉ.अशोक जिवतोडे हे आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असलेले प्रकाश पाटिल मारकवार यांना अभिनयाची विशेष आवड आहे.महाविदयालयीन जीवनात त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. राजकीय क्षेत्र सांभाळून प्रकाश पाटिल मराठी चित्रपट सृष्टीत सुदधा महत्वाची भूमिका बजावितात. त्यांच्यातील कलाकार म्हणून दडलेले सुप्त गूण अभिनय आणि चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून समाजामध्ये दिसून येतात. याआधी त्यांनी निर्मिती केलेल्या आमच्या सारखे आम्हीच या मराठी चित्रपटात सुदधा अभिनय केलेला होता. अगं अगं सुनबाई…काय म्हणता सासुबाई… या चित्रपटाचे वितरण प्रसिदध दिग्दर्शक करण जोहर यांच धर्मा प्रोडक्शन मार्फत केले जाणार आहे.चित्रपटात प्रमूख भूमिकेत प्रार्थना बेहेरे आणि निर्मिती सावंत या आहेत.