माजी सभापती स्व.संजय पाटिल मारकवार यांच्या पाचव्या  स्मृतीदिनानिमित्त मूल मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

118
माजी सभापती स्व.संजय पाटिल मारकवार यांच्या पाचव्या  स्मृतीदिनानिमित्त मूल मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन
मूल:- राजगड येथील प्रसिदध सामाजिक कार्यकर्ता,मूल पंचायत समितीचे माजी सभापती स्व.संजय पाटिल मारकवार यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त मूल मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रक्तदात्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव संतोष सिंह रावत यांची विशेष उपस्थिती यावेळी होती.माजी नगराध्यक्ष विजय चिमडयालवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार,तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरू गुरनूले,माजी अध्यक्ष घनश्याम येनूरकर,बंडू गुरनूले,विलास कागदेलवार,अनिकेत संजय मारकवार आदी मान्यवर प्रमूख अतिथी म्हणून उपस्थित होते.तत्पूर्वी स्व.संजय पाटिल मारकवार यांच्या प्रतिमेला मालार्पण करण्यात आले.दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. स्व.संजय पाटिल मारकवार हे ग्रामिण भागातील एक थोर व्यक्तिमत्व होते.मूल पंचायत समितीचे सभापती,बाजार समितीचे सभापती अशी पदे त्यांनी आपल्या कार्यकाळात भूषविली.त्यांनी आपल्या कार्यशैलीतून ग्रामिण भागाच्या विकासासाठी मोठा हातभार लावला.सामाजिक कार्यकर्ता आणि कॉंग्रेसचे नेता म्हणून त्यांचे कार्य भरीव होते.विविध उपक्रमातून त्यांनी वंचित घटकांना वेळोवेळी मदत केली.सतत त्यांची ग्रामिण भागातील शेतकरी,शेतमजूर वर्गांशी नाळ जुळलेली राहत होती.असे मत लहान बंधु आणि सामाजिक कार्यकर्ते राजू पाटिल मारकवार यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी त्यांनी स्व.संजय पाटिल मारकवार यांच्या  आठवणींना उजाळा दिला. रक्तदान शिबिरामध्ये पन्नास रक्तदात्यांनी सहभाग घेतला.चंद्रपूर येथील लाईफ लाईनची चमू येथे दाखल झाली होती.येथील एचडीएफसी बॅंकेच्या समोर रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिकेत संजय मारकवार,सामाजिक कार्यकर्ते आणि कांग्रेसचे पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले. रक्तदान शिबिराचे आयोजन राजू मारकवार, अनिकेत मारकवार आणि मित्रपरिवार यांनी सहा डिसेंबर रोजी केले होते.