वाढदिवसाच्या निमित्ताने – शुन्यातून विश्व निर्माण करणारा प्रमोद म्हशाखेत्री

261
वाढदिवसाच्या निमित्ताने
शुन्यातून विश्व निर्माण करणारा प्रमोद म्हशाखेत्री

काही माणसे आपल्या कर्तृत्वाने मोठी होतात.काही गुणांनी मोठी होतात.तर,काही आपल्या नेतृत्वांनी मोठी होतात.पण,काही माणसात कर्तृत्व सुदधा असते,गुणांचा मोठा भांडार सुदधा असतो आणि नेतृत्व करण्याची क्षमता सुदधा असते.अशी माणसे पृथ्वीतलावर अवतरतात,तेव्हा त्यांच्या कार्याची सहजच चुणूक अनेकांच्या नजरेत भरते.अशा माणसांना शोधावे लागत नाही.आपोआप सापडतात.एकाच नजरेत त्यांच्या गुणांची ओळख होते. असा तेजोमय देवमाणूस म्हणजे संगणक ऑपरेटर प्रमोद म्हशाखेत्री. आज 9 डिसेंबर रोजी प्रमोद म्हशाखेत्री यांचा वाढदिवस. 48 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्या निमित्ताने त्याच्या कार्याचा लेखाजोखा. प्रमोद म्हशाखेत्री याचा जन्म 9 डिसेंबर 1978 रोजी फुटाणा येथे झाला.घरची परिस्थीती बेताची.आई वडील दोघेही मोलमजूरी करून आपला संसार सांभाळीत होते.अशा गरीबीच्या काळातही त्यांनी प्रमोदला शिक्षणापासून वंचित ठेवले नाही.मामेगाव मूल असल्याने ते मूल येथे कामानिमित्त स्थायिक झाले.मुळात प्रमोद हा बुदधीवान प्राणी.एकदा वाचल्यानंतर सहज त्याच्या लक्षात राहण्याची किमया त्याच्यात होती.त्यामुळे एक एक पायरी शिक्षणाची चढत गेला.परिश्रमाशिवाय यश मिळत नाही.हे प्रमोद जाणून होता.कष्टाची जाणीव त्याला होती.आईवडीलांचे उपकार त्याला फेडायचे होते.गरीबी परिस्थीतीवर त्याला मात करायचे होते.त्यामुळे प्रमोद मोठया आत्मविश्वासाने आणि इच्छाशक्तीने उच्च शिक्षणापर्यंत मजल मारताना आपले ध्येय समोर ठेवून यशावर यश गाठत गेला.प्रमोद हा एम.ए. एम.एड असून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण सुदधा घेतले आहे.प्रमोद हा संगणक शास्त्रात पारंगत आहे. संगणाचे अद्ययावत ज्ञान त्याला अवगत आहे.आपल्या अगाध ज्ञानाच्या भरोवश्यावर प्रमोदने सुरूवातील संगणक ऑपरेटर म्हणून नोकरी केली.त्यानंतर सेतू केंद्र आणि प्रेरणा ऑनलाईन केंद्र चालवून बहरलेल्या संसाराला हातभार लावीत आहे. प्रमोदने आपल्या ऑनलाईन क्रेदात आणि सेतू केंद्रात जवळपास अनेक बेरोजगार युवत आणि युवतींना रोजगार सुदधा दिलेला आहे. बेरोजगार युवक आणि युवतींच्या हातांना काम देवून प्रमोदने एक मोठे समाजसेवेचे काम केलेले आहे. एकीकडे बेरोजगार युवक आणि युवती कामाच्या शोधात हताश झालेले दिसतात.तर ,दुसरीकडे प्रमोद सारखा गरीबीची जाण असलेला युवक अनेकांच्या हाताला काम देवून एक पुण्याचे काम करतो,हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.म्हणूनच प्रमोद म्हशाखेत्री हा ख-या अर्थाने देवमाणूस आहे. प्रमोदचा स्वभाव सोज्वळ,सुस्वभावी,प्रेमळ आहे. दिलखुलास माणूस आहे. भडभड बोलून टाकतो.सेतू केंद्रात येणा-या ग्राहकांना ऑनलाईन विषयी समजावून सांगतो.

 
प्रमोद हा खाजगी क्षेत्रात महावितरण मध्ये क्लार्क, नवभारत विद्यालय येथे कंत्राटी शिक्षक,गोंडवाणा विद्यापिठ गडचीरोली येथे 11 म​हिने डाटा एन्टी आपॅरेटर   म्हणून काम केले.
बल्लारपूर स्कूल मध्ये संगणक शिक्षक  आणि  घंडयाळी तासीका प्रमाणे महिला ​शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहे.
 
सोशय मिडीयाचा वापर करून शेतकरी,शेतमजूर,कामगार,विदयार्थी वर्गांसाठी शासकीय योजनाचीमाहिती प्रसारीत करतो. अनेक दाखल्यांचे काम झटक्यात करतो. ग्राहकांना ताटकळत न ठेवता त्यांच्या कामांना प्रथमतः प्राधान्य देतो. महसूल अधिकारी वर्गांच्या आदेशानुसार प्रमोद ठिकठिकाणी ग्रामिण भागात सेतू केंद्राच्या माध्यमातून शिबिर सुदधा घेतो.  ही त्याच्या कामाची शैली ग्राहकांना खिळवून ठेवते. त्यामुळेच प्रमोद म्हशाखेत्री हा मूल मध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित होतो केवळ त्याच्या प्रामाणिकपणाच्या कामामुळेच. त्याचे कार्य अतूलनीय आहे.वैशिष्टय पूर्ण आहे.त्याच्या या ऑनलाईन कामाला त्याची अर्धांगिनी वैशाली आणि मुलगा डिबेश मन लावून सहकार्य करतात. त्याच्या पाठिशी आईवडीलांचा मोठा आशीर्वाद आहे.आपल्या मुलाचे कार्य,कर्तृत्व आणि परिश्रमामुळे ते समाधानी आहेत. प्रमोदच्या निवा-याखाली सुखात आणि समाधानी जीवन जगत आहेत.प्रमोदचे कार्य फार मोठे आहे. त्याला कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही,अहंकार नाही.आपल्या कामाशी तो अतिशय प्रामाणिक आहे.एकनिष्ठेने राहून आपले कर्तव्य बजावतो.महसूल अधिकारी,मित्र मंडळी,पत्रकार मंडळी आणि स्नेही,आप्तेष्ट,नातेवाईक वर्गांशी त्याचे जिव्हाळयाचे संबध आहेत. मुळात तो संबध टिकवून ठेवण्यावर भर देतो. शुन्यातून विश्व निर्माण करणा-या माझ्या सहका-याला मनापासून सलाम… !!!

” परिस्थिती आपल्या हातात नसते,पण प्रयत्न आपले असतात. धंद्यात असो की, नोकरीत सातत्य, प्रामाणिक अभ्यास आणि मोठे स्वप्न पाहण्याची हिंमत असेल तर यश नक्की मिळते. संघर्षाने पाय ओढू देऊ नका, तोच आपल्याला मजबूत करतो. अपयश आले तरी खचून जाऊ नका, सातत्य ठेवून कठोर परिश्रमाची तयारी ठेवा, यश हमखास मिळेल.असे प्रा. प्रमोद मशाखेत्री  म्हणतो. “

 
 
लेखक – 

श्री.विनायक रेकलवार
मुख्य संपादक
जनतेचा आवाज

8975140998