मूल मध्ये रेल्वे मालधक्का होवू देणार नाही – नगराध्यक्षा एकता समर्थ यांचा खणखणीत इशारा
विशेष सभेत नगर पालिकेचा ठराव घेणार
मूल:-शासन आणि प्रस्थापितांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवताना तुरूंगात जाण्याची वेळ आली तरी जनहितासाठी तुरूंगात जाण्याची माझी तयारी आहे. पण,स्थानिक मूल मध्ये शहरवासियांना बाधीत करणारा प्रस्तावित असलेला रेल्वे मालधक्का होवू देणार नाही,असा खणखणीत इशारा येथील नगराध्यक्षा एकता प्रशांत समर्थ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ऑनलाईन सहभागी होताना दिला.याबाबत लवकरच विशेष सभेच्या माध्यमातून रेल्वे मालधक्काच्या विरोधात नगर पालिकेत एक ठराव पारित केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नगर पालिकेतील माझे संपूर्ण सहकारी स्थापन करण्यात आलेल्या मालधक्का हटाव – मूल शहर बचाव संघर्ष समितीला संपूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मूल मध्ये रेल्वे मालधक्का होणार असल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.याबाबत संघर्ष समितीच्या वतीने स्थानिक विश्राम गृहात रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना संघर्ष समितीचे सदस्य म्हणाले, काही राजकीय मंडळी आपल्या स्वार्थासाठी रेल्वे मालधक्का मूल मध्ये आणण्याच्या हालचाली करीत आहेत.ही त्यांची कृती जनहिताच्या विरोधात असून मूल शहराला प्रदुषणाच्या विळख्यात ढकलणारी आहे.सुरजागड येथून लोहखनिजाची वाहतूक झाल्यानंतर त्यातून उडणा-या धूळ आणि रासायनिक घटकांमुळे नागरिकांना मोठया प्रमाणात दुष्परिणाम भोगावे लागतील.स्वच्छ सुंदर आणि विकसित शहराला वेठीस धरण्याचा त्यांचा हा प्रकार निषेधार्य असल्याचे संघर्ष समितीने यावेळी स्पष्ट केले.रेल्वे मालधक्क्यांमुळे महाविदयालयीन विदयार्थी, शालेय विदयार्थी,जनसामान्य नागरिक,महिला यांच्या आरोग्यांवर विपरीत परिणाम होण्याची भिती व्यक्त केली.रेल्वे मालधक्क्यांमुळे स्थानिकांना कोणताही रोजगार उपलब्ध होणार नाही. शहराची नासाडी होईल,व्यसनाधिता वाढेल आणि प्रसंगी गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.त्याचा गंभीर परिणाम नवयुवकांवर होण्यास वेळ लागणार नाही. बफर झोन मधील वाघ,बिबट सह इतर वन्यप्राणी संकटात सापडतील आणि यातून मानव वन्यजीव संघर्ष अधिक वाढण्यास मदत होईल.त्यामुळे लोहखनिजाच्या वाहतुकीसाठी प्रस्तावित असलेला रेल्वे मालधक्का तात्काळ रदद करण्यात यावा.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मूल शहर संघर्ष समितीच्या वतीने यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेत संघर्ष समितीचे समन्वयक जीवन कोंतमवार,विजय सिदधावार,अनिल मोगरे,अॅड.प्रणय वैरागडे,अॅड.अश्विन पॉलिकर,बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी आपले स्पष्ट मत मांडले. संचालन जेष्ठ पत्रकार संजय पडोळे यांनी केले.आभार प्रा.प्रशांत वासाडे यांनी मानले. पत्रकार परिषदेला दिनेश गोयल,विवेक मांदाडे,लवनिश उधवानी,डेव्हीड खोब्रागडे,कैलास चलाख,प्राचार्य अविनाश गरपल्लीवार,अमोल बच्चूवार,जगदीश कडस्कर,नरेश बोमनवार,संदीप मोहबे,राकेश मोहूर्ले,श्रीकांत बुक्कावार, नगरसेवक अतूल गोवर्धन, नगरसेविका नलिनी आडपवार यांच्यासह संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.